|

नाशिक – येथे पुढील वर्षी होणार्या सिंहस्थ कुंभपर्वात केवळ हिंदूंनीच त्यांची दुकाने (स्टॉल) लावावीत. जर मुसलमानांसह अन्य पंथियांनी येथे घुसखोरी करून दुकाने लावली, तर ती उखडून टाका, असे परखड आवाहन राज्याचे मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री श्री. नितेश राणे यांनी येथे केले. येथे १४ मार्च या दिवशी ‘हिंदु हित रक्षा’च्या वतीने सिद्ध करण्यात आलेल्या ‘हिंदु व्यावसायिक आणि कारागीर सूची’च्या प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते.
🚩 Nashik Kumbh Mela 2027: Call for Hindu-Owned Shops at Simhastha Kumbh
Maharashtra Minister @NiteshNRane has appealed that only Hindu-owned shops should be allowed during the Simhastha Kumbh Mela in Nashik (2027).
🔹 He urged authorities to remove shops run by infiltrator… pic.twitter.com/iJPYqwgkyf
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) March 15, 2026
हिंदूंकडूनच वस्तू खरेदी करा !
मंत्री राणे पुढे म्हणाले, ‘‘हिंदूंनी हिंदूंकडूनच वस्तू खरेदी कराव्यात’, या संकल्पनेचे मी स्वागत करतो. ही काळाची आवश्यकता आहे. खारघर येथेही मी हीच भूमिका मांडली होती, तेव्हा प्रसारमाध्यमांनी माझ्यावर टीका केली; परंतु धर्माच्या रक्षणासाठी अशा टीकेची मला पर्वा नाही.’’
धर्मांधांचा दुटप्पीपणा !
कुंभपर्वाच्या निमित्ताने हिंदूंविना कुणीही दुकाने लावणार नाही. सध्या रमझान मास चालू आहे. त्यांच्या खाद्यपदार्थांच्या दुकानांत एकही हिंदु शोधून सापडणार नाही. त्यांच्या कुराणात ‘काफिरांकडून काहीही घेऊ नका’, असे स्पष्ट लिहिले आहे. त्यामुळे ते तसे वागतात. मग आम्ही आमच्या धर्माचे रक्षण करण्यासाठी घेतलेली भूमिका चुकीची कशी ? मी कुराण २ वेळा वाचले आहे. ‘१० टक्के अधिक जकात द्या’, असे त्यात नमूद आहे. तो पैसा जिहादसाठी वापरतात. ‘इतरांचा धर्म न्यून करून स्वतःचा धर्म वाढवावा’, असेही त्यात म्हटले आहे.
हिंदू हित रक्षा, नाशिक यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या "हिंदूंचा रुपया हिंदूलाच" या संमेलनाला आज उपस्थित राहिलो. याप्रसंगी दैनंदिन जीवनात आवश्यक असणाऱ्या विविध क्षेत्रातील शेकडो हिंदू कारागीर, लघु उद्योजक व व्यावसायिकांची माहिती असलेल्या विशेष यादीचे प्रकाशन व लोकार्पण… pic.twitter.com/TYrok4Efk5
— Nitesh Rane (@NiteshNRane) March 14, 2026
धर्मांधांकडून वसूल केलेल्या पैशांचा ‘लव्ह जिहाद’साठी वापर !
धर्मांधांकडून वसूल केला जाणारा जकात आणि अन्य पैसा ‘लव्ह जिहाद’सारख्या देशविघातक कृत्यांसाठी वापरला जातो. आपला पैसा ‘लव्ह जिहाद’साठी वापरला जात असेल, तर ते आपण घ्यायचे का ? त्यामुळे सिंहस्थ कुंभपर्वात एकही जिहादी येता कामा नये. आपण सतर्क व्हायला हवे.
सिंहस्थ कुंभपर्वात धर्मांधांना थारा नको !
मंत्री राणे पुढे म्हणाले, ‘‘कुंभपर्व हे हिंदूंचे श्रद्धास्थान आहे. येथे एकही जिहादी येता कामा नये. त्र्यंबकेश्वरमध्ये दुकानांवर हिंदूंची नावे लावून आत ‘अब्दुल’ बसलेला असतो, असे प्रकार समोर आले आहेत. ही फसवणूक आता खपवून घेतली जाणार नाही. सिंहस्थ कुंभपर्वावर बारकाईने लक्ष ठेवा. जर कुणी धर्मांध दुकान लावतांना दिसला, तर ते उखडून फेका. आम्ही मंत्रालयात बसलो आहोत. त्यामुळे घाबरण्याचे कारण नाही.’’
‘लव्ह जिहाद’विरोधी कठोर कायदा लवकरच !
‘राज्यात धर्मांतरविरोधी कायदा आणण्याची प्रक्रिया चालू झाली असून लवकरच ‘लव्ह जिहाद’च्या विरोधात देशातील सर्वांत कठोर कायदा महाराष्ट्रात लागू केला जाईल’, अशी ग्वाही त्यांनी या वेळी दिली.
पाक, बांगलादेश आणि अफगाणिस्तान येथील हिंदु अन् इतर अल्पसंख्यांक लोकसंख्येची घट
बौद्ध चकमा, हिंदु हाजोंग आणि धर्मांध रोहिंग्या शरणार्थी !
दैनिक ‘सनातन प्रभात’च्या वार्ताहराच्या प्रबोधनानंतर मुगाळी (गोवा) येथील रस्त्याच्या बाजूचा कचरा हटवला
अर्पणदात्यांनो, गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने धर्मकार्यार्थ धन अर्पण करून गुरुतत्त्वाचा लाभ करून घ्या !
पंढरपूर येथे तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या ९ नगरसेवकांचा भाजपला पाठिंबा !
छत्रपती संभाजीनगर येथे औरंगजेबाचे उदात्तीकरण करून धर्मांधाचा धिंगाणा, अश्लील भाषेत शिवीगाळ !