|

रिचमंड (अमेरिका) – अमेरिकेतील व्हर्जिनिया राज्यात असलेल्या नॉरफोक येथील ‘ओल्ड डोमिनियन’ विद्यापिठात १२ मार्च या दिवशी गोळीबाराची घटना घडली. यात १ जण ठार, तर २ जण घायाळ झाले होते. या घटनेत गोळीबार करणार्याचे नाव महंमद जाल्लोह असे असून तो ‘आर्मी नॅशनल गार्ड’चा माजी सैनिक होता. वर्ष २०१६ मध्ये इस्लामिक स्टेटला प्रत्यक्ष साहाय्य केल्याप्रकरणी जाल्लोहला दोषी ठरवून ९ वर्षांची शिक्षाही झाली होती. तथापि बाहेर आल्यानंतर त्याला रमझानच्या महिन्यात आतंकवादी आक्रमण करायचे होते. यामुळेच त्याने विद्यापिठात गोळीबार केला.
9 years in prison wasn't enough to change him.
Virginia, USA: Mohamed Jalloh, who previously served 9 years for aiding ISIS, planned a Ramadan attack.
The shooting left 1 dead and 2 injured.
While most criminals look for a fresh start, the jihadi ideology remains a constant… pic.twitter.com/kc1uamWggA
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) March 14, 2026
या घटनेविषयी अमेरिकेची अन्वषेण यंत्रणा ‘एफ्.बी.आय.’चे (फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन’चे) विशेष अधिकारी डॉमिनिक इव्हान्स यांनी सांगितले की, जाल्लोह याने महाविद्यालयातील ‘रिझर्व्ह ऑफिसर्स ट्रेनिंग कॉर्प्स’च्या वर्गात बलपूर्वक प्रवेश केला. ‘अल्लाहू अकबर’ (अल्ला महान आहे) असा घोष देत त्याने गोळीबार चालू केला. यात प्रशिक्षक लेफ्टनंट कर्नल ब्रँडन शाह यांचा मृत्यू झाला, तर २ जण घायाळ झाले. या वेळी तेथे उपस्थित विद्यार्थ्यांनी त्याला रोखून ठार मारले. इव्हान्स यांनी यास ‘आतंकवादी कृत्य’ असे संबोधले आहे.
संपादकीय भूमिकायावरून जिहाद्यांची मानसिकता कशी असते ?, हे लक्षात येते ! एखादा गुन्हेगार ९ वर्षे कारावास भोगून आल्यानंतर तो पुढे चांगले आयुष्य जगण्याची शक्यता अधिक असते. जिहादी आतंकवाद्यांमध्ये मात्र पालट होत नाही, हेही यावरून दिसून येते. त्यामुळे आतंकवादी आक्रमण करणारे असोत आणि त्यांना साहाय्य करणारे, यांना फासावर लटकवण्याची शिक्षा व्हायला हवी ! |
Maharashtra ATS Raid : आंतकवादविरोधी पथकाच्या पुणे-पिंपरी चिंचवडमध्ये २३ हून अधिक ठिकाणी धाडी !
UK Mandir Auction : ब्रिटनमध्ये लिलावात मंदिराची जागा मुसलमानांना विकली !
Gujarat ATS Action : भगवान जगन्नाथांच्या रथयात्रेपूर्वी गुजरातमध्ये ५ आतंकवाद्यांना अटक
Iran US War : इराणचे हॉर्मुझमध्ये तेलवाहू नौकेवर आक्रमण : १ भारतीय ठार
France Foils Islamic Terror : फ्रान्समधील ज्यू धर्मियांवरील संभाव्य आतंकवादी आक्रमण उधळले
(म्हणे) ‘संयुक्त राष्ट्रांच्या ठरावानुसार काश्मीरचे सूत्र सोडवावे !’ – Pakistan