
काबुल (अफगाणिस्तान) – पाकिस्तानने अफगाणिस्तानची राजधानी काबूलसह विविध ठिकाणी १२ मार्चला रात्रीच्या वेळी हवाई आक्रमणे केली. यात ४ लोक ठार, तर १५ जण घायाळ झाले. तालिबान सरकारच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार पाकिस्तानने कंदाहार विमानतळाजवळील खासगी विमान आस्थापनाच्या तेल साठ्यावर बाँबफेक केली. या आक्रमणाला अफगाणिस्तान जोरदार प्रत्युत्तर देण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
पाकिस्तानने तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान (टीटीपी) या संघटनेशी निगडीत आतंकवाद्यांना लक्ष्य केल्याचा दावा केला आहे. पाकिस्तानी सैन्याने या संघटनेच्या तळाला अचूक लक्ष्य केल्याचा दावा सूत्रांनी केला आहे.
टीटीपीला साहाय्य करत असल्याचा आरोप अफगाणिस्ताने फेटाळला
टीटीपीच्या आतंकवाद्यांना आश्रय दिल्याचा आरोप अफगाणिस्तावर केला जातो. पाकिस्तानमध्ये झालेल्या आक्रमणांसाठी यांनाच उत्तरदायी ठरवण्यात आले होते. अफगाणिस्तानकडून मात्र हे दावे फेटाळण्यात आले आहेत. अफगाणिस्तानच्या भूमीचा वापर दुसर्या देशावर आक्रमण करण्यासाठी केला जात नाही, अशी भूमिका तालिबान सरकारने मांडली.
अफगाणिस्तानचे प्रत्युत्तरात पाकवर हवाई आक्रमण
अफगाणिस्तानच्या संरक्षण मंत्रालयाने दावा केला आहे की, अफगाणी वायूदलाने १२ मार्चला पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वामध्ये हवाई आक्रमण करून पाकच्या आक्रमणाला प्रत्युत्तर दिले आहे. या वेळी कोहाट प्रदेशातील पाकिस्तानी सैन्य तळांना लक्ष्य करण्यात आले. या आक्रमणात कुणी ठार झाले किंवा घायाळ झाले, याची अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.
Maharashtra ATS Raid : आंतकवादविरोधी पथकाच्या पुणे-पिंपरी चिंचवडमध्ये २३ हून अधिक ठिकाणी धाडी !
UK Mandir Auction : ब्रिटनमध्ये लिलावात मंदिराची जागा मुसलमानांना विकली !
Iran US War : इराणचे हॉर्मुझमध्ये तेलवाहू नौकेवर आक्रमण : १ भारतीय ठार
France Foils Islamic Terror : फ्रान्समधील ज्यू धर्मियांवरील संभाव्य आतंकवादी आक्रमण उधळले
(म्हणे) ‘संयुक्त राष्ट्रांच्या ठरावानुसार काश्मीरचे सूत्र सोडवावे !’ – Pakistan
राजकारण करायचे असेल, तर गणवेश उतरवून निवडणुकीत भाग घ्या ! – Maulana Fazlur Rehman