
नागडे-उघडे, वेडे-वाकडे काँग्रेसी देहलीतील ‘एआय (कृत्रिम बुद्धीमत्ता) समिट’मध्ये तमाशे करत राहिले आणि त्याच वेळी ‘गूगल’ने भारतात एका महाकाय ‘एआय डेटा सेंटर’च्या उभारणीत १५ बिलियन डॉलर्सची (१ लाख ३६ सहस्र कोटी रुपयांहून अधिक) गुंतवणूक करायचे ठरवले आहे. ‘गूगल’ची अमेरिकेबाहेर ही सगळ्यात मोठी गुंतवणूक असेल. विशाखापट्टणम् येथे आकाराला येणारे हे ‘एक गिगावॅट एआय डेटा सेंटर हब’, म्हणजे ‘एआय’च्या जागतिक भविष्याला नवी दिशा देणारी एक ‘गेम चेंजर’ (क्रांती घडवून आणणारी) योजना आहे.

वेगवान इंटरनेटविना ‘एआय’चा उपयोग होऊ शकत नाही. यासाठी ‘भारत ते दक्षिण आफ्रिका’, ‘भारत ते सिंगापूर’ आणि ‘भारत ते ऑस्ट्रेलिया’, अशा नव्या कोर्या इंटरनेट केबल्स समुद्राखालून घालण्यात येत आहेत. आजवर अशा केबल्स केवळ अमेरिका, युरोप आणि चीन यांच्याशी जोडलेल्या होत्या. आता भारत हे नवे केंद्र सज्ज होत आहे आणि संपूर्ण दक्षिण गोलार्धाला ‘एआय’ सेवा भारतातून पुरवल्या जाणार आहेत. त्यामुळे या विकसनशील जगाला अधिक वेगवान ‘एआय’ सेवा पुरवणे शक्य होणार आहे.
याखेरीज भारतातील १० कोटी लोकांना ‘एआय’चे विनामूल्य प्रशिक्षण ‘गूगल’कडून दिले जाणार आहे, म्हणजेच ‘एआय’चा लाभ केवळ ‘कॉर्पोरेट्स’ (व्यावसायिक आस्थापने) पुरता मर्यादित न रहाता सर्वसामान्य भारतियांप्रमाणे पोचणार आहे. त्यांना प्रगतीच्या नव्या संधी उपलब्ध करून देणार आहे. ‘गूगल’चे असे मत आहे की, या पुढील १०० कोटी नवीन ‘एआय’च्या (वापरकर्त्यांना) ‘सिलिकॉन व्हॅली’तून नव्हे, तर भारतातून सेवा दिली जाणार आहे. ‘एआय’ क्रांतीची बस भारत चुकवणार नाही, याची मोदी सरकारने खात्री केली आहे.
देहलीतील ‘एआय समिट’ प्रचंड यशस्वी ठरले आहे. कुठल्या तरी एका खासगी विद्यापिठाने केलेल्या चौर्यकर्मावरून भारताने या क्षेत्रात उचललेल्या दमदार पावलांची कुचेष्टा करण्याचा आणि या ‘समिट’ला अपशकून करण्याचा प्रयत्न करणारी काँग्रेस अन् त्यांची दरबारी ‘इकोसिस्टम’ (यंत्रणा) नेहमीप्रमाणे पुन्हा एकदा तोंडावर आपटली आहे.
– श्री. अभिजित जोग, प्रसिद्ध लेखक, पुणे. (२५.२.२०२६)
कथित सामाजिक कार्यकर्त्या तिस्ता सेटलवाड यांचे पारपत्र परत करण्यासंदर्भात सर्वाेच्च न्यायालयाची संयत भूमिका !
मोगल, ब्रिटीश आणि काँग्रेस यांनी केले नाही, ते महाराष्ट्र सरकार करायला निघाले आहे !
छत्रपती शिवरायांना हिंदवी स्वराज्याच्या विचारांनी भारलेले अन् हिंदूंसाठी उभे रहाणारे युवक हवे आहेत !
शहरी नक्षलवादामुळे झारखंड येथील आदिवासींचे अस्तित्व धोक्यात !
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त रवींद्र भवन सांखळीच्या वतीने ‘गीत सावरकर’ कार्यक्रम सादर
भारत बळजबरीने घुसखोरांना बांगलादेशात ढकलत आहे ! – Bangladesh Allegation