मिरवणूक मशिदीजवळून जातांना घोषणा देणे, वाद्य वाजवणे आणि फटाके फोडण्यावर घातली बंदी

चेन्नई (तमिळनाडू) – तमिळनाडूतील उथमापालयम येथील कळाथीश्वरर ज्ञानाम्बिगै मंदिराच्या मासिमगम यात्रा सणाच्या प्रमुख उपक्रमातील एक धार्मिक मिरवणूक मार्गात एक मशीद असून त्या मार्गावरून जाण्याला स्थानिक मुसलमानांनी विरोध केला. या विरोधामुळे २५ फेब्रुवारीच्या रात्री परिसरात तणाव निर्माण झाला आणि काही घंट्यांपर्यंत यात्रा अडवावी लागली. या वादामुळे प्रशासन आणि पोलीस यांना हस्तक्षेपाला करावा लागला.
Uthamapalayam, Tamil Nadu: Hindu religious procession halted for hours near a mosque during Namaz 🚩
Reports say slogans, music & firecrackers were restricted as the Masimagam Yatra of Kalatheeswarar Gnanamabigai Temple passed by the mosque.
Is Tamil Nadu in India or Pakistan?… pic.twitter.com/CWN3YVJV9c
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) February 28, 2026
१. मिरवणुकीत भाग घेत असलेले ओक्कलिग गाउंडर समुदायाचे भक्त पूजा प्रतिमा इंदिरानगर भागात नेत होते, जे १९ फेब्रुवारीपासून चालू असलेल्या मंडगपडी कार्यक्रमाचा भाग होते. हा कार्यक्रम मार्चच्या पहिल्या आठवड्यात होणार्या मुख्य सणाअगोदरच्या सिद्धतेशी संबंधित आहे. यात्रेची सिद्धता चालू असतांना मुसलमानांनी ‘मशिदी जवळून मिरवणूक नेल्यास नमाजपठणावर परिणाम होईल’, असे सांगत विरोध केला. त्यांनी यात्रेची वेळ पुढे ढकलावी किंवा पर्यायी मार्ग निवडावा, अशी मागणी केली. त्यामुळे हिंदु भक्त आणि मुसलमान यांच्यात तणाव निर्माण झाला. स्थानिक भाजप आणि हिंदु मुन्नानी संघटना यांचे कार्यकर्ते घटनास्थळी जमा झाले.
२. स्थानीय महसूल विभाग अधिकारी सायद महंमद आणि पोलीस उपअधीक्षक पोनारासु यांनी मुसलमानांशी चर्चा केली आणि परस्पर समजूत करून घेतली. चर्चेनंतर ठरले की, मशिदीमधील नमाजपठण पूर्ण झाल्यानंतर मिरवणूक त्या मार्गाने निघू शकते. परिणामी रात्री १० वाजून ३० मिनिटांनंतर मिरवणुकीला त्या मार्गाद्वारे जाण्याची अनुमती देण्यात आली. तथापि कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी मशिदीजवळ घोषणा देणे, वाद्य वाजवणे, फटाके फोडणे यांवर बंदी घालण्यात आली. यानंतर येथून काढण्यात आलेली मिरवणूक शांततेच पुढे गेली.
संपादकीय भूमिका
|
हिंदूविरोधी ‘देवस्थान इनाम जमीन निर्मूलन अधिनियम’ रहित करावा !
Monsoon Reached Keralam : मौसमी पावसाचे केरळम्मध्ये आगमन !
‘हाफकीन’ आणि घाना सरकार यांच्यात सर्पदंशावरील उपचारपद्धतीसह अन्य संशोधनासाठी सहकार्य करार होणार !
जेजुरीतील रसायनयुक्त भंडार्याच्या विक्रीविरुद्ध भाजप आमदार विक्रम पाचपुते आक्रमक !
आरोपी शाहिना रफिक हिला पुण्यात अन्वेषणासाठी बोलावले
तुमकुरू (कर्नाटक) येथे श्रीराममंदिराच्या शेजारी अल्पसंख्यांकांचे वसतीगृह बांधण्याचा डाव !