|
श्री. प्रीतम नाचणकर, विशेष प्रतिनिधी, दैनिक ‘सनातन प्रभात’
मुंबई, २५ फेब्रुवारी (वार्ता.) – विविध समाजघटकांच्या कल्याणासाठी सरकारने विविध महामंडळे, प्राधिकरणे आदींची स्थापना केली आहे. या सरकारी संस्था सरकारला आर्थिक लाभ मिळवून देण्यासाठी नव्हे, तर समाजहितासाठी सेवार्थ हेतूने चालवल्या जातात; परंतु ‘सेवार्थ’च्या नावाखाली या संस्थांची आर्थिक बेशिस्त खपवली जात आहे. १४ डिसेंबर २०२५ या दिवसापर्यंत राज्यातील महामंडळे, मंडळे, प्राधिकरणे, आयोग, संस्था आणि विद्यापिठे यांचे तब्बल ७६८ वार्षिक अहवाल प्रलंबित आहेत. यांमध्ये वार्षिक लेखापरीक्षण आणि कार्य अहवाल यांचा समावेश आहे. यात एक वेळ १-२ वर्षे अहवाल प्रलंबित असणे समजून घेण्यासारखे आहे; परंतु यांतील काही संस्थांचे अहवाल तब्बल १४ वर्षांपासून प्रलंबित असल्याची विदारक स्थिती आहे. एकंदरीत हा प्रकार प्रशासकीय शिस्तीला हरताळ फासणारा आहेच; परंतु विधीमंडळासाठीही अवमानकारक आहे. ‘सनातन प्रभात’चे विशेष प्रतिनिधी श्री. प्रीतम नाचणकर यांना विधीमंडळाकडून माहितीच्या अधिकाराच्या अंतर्गत ही माहिती उपलब्ध झाली आहे. सरकारने याकडे गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक आहे.
🚨 Sanatan Prabhat EXCLUSIVE
⚠️ 125 Govt bodies in Maharashtra failed to submit audit reports for 3 to 14 years
📄 768 annual audit/activity reports pending
🔎 Revelation through RTI.
Is this mere negligence… or systemic corruption?If audits aren’t filed for years, who is… pic.twitter.com/VT7HYyBuKK
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) February 26, 2026
माहिती अधिकाराच्या अंतर्गत मिळालेल्या माहितीची धारिका :
|
शासकीय आणि निमशासकीय महामंडळे यांनी प्रतिवर्षी सरकारला हिशेब सादर करणे आवश्यक आहे. आर्थिक शिस्त रहाण्यासाठी आणि अपप्रकार टाळण्यासाठी या संस्थांनी प्रतिवर्षी वार्षिक अहवाल विधीमंडळात सादर करणे बंधनकारक असते; परंतु वार्षिक अहवाल सादर करण्यासाठी विधानमंडळ सचिवालयाकडून वारंवार पत्रव्यवहार केला जाऊनही या संस्था त्याला जुमानत नाहीत. ३ ते १४ वर्षे प्रलंबित असलेल्या संस्थांची संख्या तब्बल १२५ इतकी आहे. यामध्ये विद्यापिठांचाही समावेश आहे.
सर्वाधिक वार्षिक अहवाल प्रलंबित असलेल्या संस्था !

वर्षनिहाय प्रलंबित अहवालांची वर्गवारी !
विलंबाच्या कारणांचा केवळ सोपस्कार !

प्रलंबित अहवाल विधीमंडळात सादर करतांना त्यासमवेत विलंबाची कारणेही देण्याचा नियम आहे; पण प्रत्यक्षात विलंबाची कारणे देण्याचा केवळ सोपस्कार केला जातो. विलंबाची कारणे देण्याऐवजी बहुतांश संस्था प्रक्रियेचा घटनाक्रम देतात; परंतु विलंबाची ठोस कारणे, त्रुटी आणि त्यांवरील उपाययोजना सादर करत नाहीत. त्यामुळे विलबांची कारणे हा केवळ सोपस्कार झाला आहे.
याविषयी विधानमंडळ सचिवालयातील संबंधित विभागाच्या एका अधिकार्यांनी महामंडळांना लेखापरीक्षणासाठी ‘सरकारी हिशेबनीस’ उपलब्ध होत नसल्याचे सांगितले. (यापेक्षा संतापजनक कारण ते कोणते ? सरकारी संस्थांना हिशेब करायला कुणी सापडत नाही, म्हणून १४ वर्षे अहवालच तयार करायचे नाहीत ? अशी उत्तरे देणार्या सरकारी संस्थांच्या अधिकार्यांना आता बडतर्फच केले पाहिजे ! – संपादक)
एकंदरीत प्रशासकीय आणि विधीमंडळ यांच्या कामकाजाच्या दृष्टीने हा प्रकार अत्यंत गंभीर आहे. याविषयी खरेतर सदस्यांनी सभागृहात आवाज उठवणे अपेक्षित आहे; परंतु तसे होत नाही. त्यामुळे ‘सेवार्थ’च्या नावाखाली शासनकृत महामंडळे, मंडळे, प्राधिकरणे यांचा गलथान कारभार वाढत आहे.
विधीमंडळाचे सचिव जितेंद्र भोळे यांची प्रतिक्रिया !
त्या-त्या संस्थेच्या नियमानुसार अहवाल सभागृहात सादर केले जातात. पूर्वी अहवाल सादर व्हायला अधिक विलंब होत होता. त्या तुलनेत आता पालट आहे, अशी प्रतिक्रिया अहवाल सादर होण्याला होत असलेल्या विलंबाविषयी विधीमंडळाचे सचिव जितेंद्र भोळे यांनी ‘सनातन प्रभात’कडे व्यक्त केली.
संपादकीय भूमिका
|


नक्षली कारवायांमुळे उपेक्षित गडचिरोलीतील २२ ठिकाणी होणार ‘आपले सरकार सेवा केंद्रे’
मोशी दुर्घटनेप्रकरणी मुख्य आणि कार्यकारी अभियंते निलंबित !
सत्र न्यायालयाने दिलेली जन्मठेपेची शिक्षा उच्च न्यायालयाकडून रहित !
न्यायाधिशांच्या खुर्चीवर काळी जादू करणार्या महिलेला अटक
(म्हणे) ‘पीओपीच्या मूर्तींमुळे प्रदूषण होत असल्याने त्यावर बंदी आणावी !’
थुंकणार्याकडून आता अडीच सहस्र रुपये दंड वसूल करा ! – मुंबई उच्च न्यायालय