
नवी देहली – भारताचे माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर आणि कपिल देव यांच्यासह जगभरातील क्रिकेट संघांच्या १४ माजी कर्णधारांनी पाकिस्तान सरकारला पत्र लिहून पाकचे माजी पंतप्रधान आणि विश्वचषक विजेते कर्णधार इम्रान खान यांच्याशी कारागृहात निष्पक्ष वागणूक देण्याची मागणी केली आहे. या पत्रावर स्वाक्षरी करणार्यांमध्ये सुनील गावस्कर, कपिल देव, मायकेल ॲथरटन, ॲलन बॉर्डर, ग्रेग चॅपेल, इयान चॅपेल, बेलिंडा क्लार्क, डेव्हिड गॉवर, नासिर हुसेन, क्लाईव्ह लॉयड, स्टीफन वॉ आणि जॉन राईट यांसारख्या क्रिकेटपटूंचा समावेश आहे. सर्वांनी पत्रात इम्रान खान यांच्या क्रिकेटमधील योगदानाची आठवण करून देत पाकिस्तान सरकारकडे आवाहन केले आहे. अलीकडेच इम्रान खान यांच्या प्रकृतीविषयी गंभीर माहिती समोर आली होती. कारागृहात असतांना त्यांच्या दृष्टीची क्षमता सातत्याने न्यून होत असल्याचा दावा माध्यमांतील वृत्तांमध्ये करण्यात आला.
14 former cricket captains, including legends Sunil Gavaskar & Kapil Dev, have written to the Pakistan Govt in support of Imran Khan. ✍️🏏
But a serious question arises: Have our icons forgotten Khan’s past rhetoric?
From calling India-Pakistan matches a "Jihad" to his stance… pic.twitter.com/3Ut1GdFbUh
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) February 17, 2026
माजी कर्णधारांनी पत्रात नमूद केले आहे की,
१. आम्ही आमच्या राष्ट्रीय संघांचे माजी कर्णधार म्हणून पाकिस्तानचे नामांकित क्रिकेटपटू आणि जागतिक क्रिकेटमधील महान व्यक्तीमत्त्व इम्रान खान यांच्याशी झालेल्या कथित वागणुकीविषयी आणि कारागृहातील परिस्थितीविषयी गंभीर चिंतेने पत्र लिहित आहोत.
| जगभरातील क्रिकेट संघांच्या १४ माजी कर्णधारांनी पाकिस्तान सरकारला लिहिलेले पत्र !
Notably, NO Pakistani name is on the list !!! |
२. क्रीडाक्षेत्रातील त्यांच्या योगदानाची जगभरात प्रशंसा केली जाते. कर्णधार म्हणून त्यांनी वर्ष १९९२ च्या क्रिकेट विश्वचषकात पाकिस्तानला ऐतिहासिक विजय मिळवून दिला. ते आतापर्यंतच्या सर्वोत्तम अष्टपैलू आणि कर्णधारांपैकी एक आहेत.
३. क्रिकेटव्यतिरिक्त इम्रान खान यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान म्हणून कार्य केले आणि कठीण काळात देशाचे नेतृत्व केले. त्यांच्या आरोग्याविषयीच्या अलीकडील वृत्तांमुळे, विशेषतः कोठडीत असतांना दृष्टी न्यून होणे आणि प्रकृती खालावल्याच्या बातम्यांमुळे आम्ही अत्यंत चिंतेत आहोत.
४. इम्रान खान यांच्यासारख्या व्यक्तीमत्त्वाला माजी राष्ट्रीय नेते आणि जागतिक क्रीडा प्रतीक म्हणून योग्य तो सन्मान मिळायला हवा, असा आमचा विश्वास आहे. पाकिस्तान सरकारने याची निश्चिती करावी, अशी आमची नम्र विनंती आहे.
संपादकीय भूमिकाभारताच्या विरोधातील क्रिकेटचे सामने जिहाद म्हणून खेळणारे, तसेच पंतप्रधान असतांना भारताच्या विरोधात गरळ ओकणारे इम्रान खानच होते, हे भारताचे महान क्रिकेटपटू विसरले का ? |

धर्मांतरितांना अनुसूचित जमातीच्या सवलती द्यायच्या का ?, हे निश्चित करण्यासाठी महाराष्ट्रात समिती स्थापन !
Amir Khan : (म्हणे) ‘मी सोनम वांगचूक यांना ‘थ्री इडियट्स’ चित्रपटापूर्वी भेटलोच नव्हतो !’
Teesta River Project : बांगलादेशाने भारताऐवजी चीनला दिला ९ सहस्र कोटी रुपयांचा तिस्ता नदी प्रकल्प
US Attack on the Chabahar port : अमेरिकेचे इराणमधील भारताने विकसित केलेल्या चाबहार बंदरावर मोठे आक्रमण
JeM Terrorist Arrested : गुजरातमध्ये जैश-ए-महंमदशी संबंधित ५ आतंकवाद्यांना अटक
BLA Attack : पाकिस्तानच्या सैन्य ताफ्यावर आक्रमण करून ४५ हून अधिक सैनिकांना ठार मारले ! – ‘बलुच लिबरेशन आर्मी’चा दावा