उत्तराखंडमधील उधमसिंह नगर येथील घटना
(‘कावडधारक’ म्हणजे गंगा जल घेऊन गावातील शिवमंदिरात जाऊन जलाभिषेक करणारे)
डेहराडून (उत्तराखंड) – राज्यातील उधमसिंह नगर जिल्ह्यातील जसपूर येथे महाशिवरात्रीच्या पवित्र दिवशी अब्दुलवारी चौकाजवळील एका घराच्या छतावरून काही मुसलमान मुलांनी काही कावडधारकांवर प्रथम फ्रूटी पेयाची रिकामी पाकिटे फेकली आणि त्यानंतर लाकडाच्या काठ्याही टाकल्या. या घटनेचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांवर प्रसारित होताच संपूर्ण परिसरात संताप उसळला आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले.
MahaShivaratri Disrespect in Uttarakhand?
In Udham Singh Nagar, empty packets were thrown at Kanwar yatris during #MahaShivratri
Why does such hostility surface during Hindu festivals?
People expect stricter action to ensure respect and law & order in Uttarakhand. pic.twitter.com/ZGra3nq5Xt
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) February 16, 2026
भाजपचे कार्यकर्ते आणि हिंदुत्वनिष्ठ संघटनांशी संबंधित सदस्य थेट पोलीस ठाण्यात पोचले. दुसरीकडे मुसलमानही तेथे एकत्र जमले. काही काळ दोन्ही गट समोरासमोर उभे राहिले आणि परिस्थिती बिघडण्याच्या उंबरठ्यावर पोचली. वातावरण इतके तापले की, पोलिसांना तातडीने हस्तक्षेप करावा लागला, अन्यथा प्रकरण नियंत्रणाबाहेर जाऊ शकले असते.
पोलिसांनी संबंधित मुले आणि त्यांचे पालक यांना पोलीस ठाण्यात बोलावून चौकशी केली आणि ‘त्यांच्यावर कठोर कारवाई करणार’, असे आश्वासन दिल्यानंतर परिस्थिती काहीशी निवळली. भाजपचे नेते श्री. शीतल जोशी यांनी हा प्रकार पूर्वनियोजित असल्याचा आरोप केला असून कावड यात्रेत अडथळा निर्माण करण्याच्या उद्देशाने तो घडवून आणल्याचे म्हटले आहे. दोषींवर कठोरात कठोर कारवाईची मागणी त्यांनी केली आहे. पोलिसांनी तपासासाठी २ दिवसांची मुदत घेतली असून काही जणांना कह्यात घेतले आहे.
संपादकीय भूमिका
|

काँग्रेसच्या हुकूमशाहीचा इतिहास आता एन्.सी.ई.आर्.टी.च्या विद्यार्थ्यांसमोर !
Ram Mandir Donation Case : श्रीराममंदिरातील दान चोरीच्या प्रकरणी अंततः गुन्हा नोंद : २ जणांना अटक
Seelampur Murder : देहलीतील मुसलमानबहुल सीलमपूरमध्ये १६ वर्षांच्या हिंदु मुलाची मुसलमानांकडून निर्घृण हत्या
Love Jihad : गेल्या २४ घंट्यांत उघड झाल्या लव्ह जिहादच्या ३, तर धर्मांतराची १ घटना !
‘लव्ह जिहाद’च्या आंतरराष्ट्रीय षड्यंत्राच्या प्रकरणी १४ जणांविरुद्ध दोषारोपपत्र सादर !
पनवेल येथील ७ गायींच्या मृत्यू प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करणार ! – उदय सामंत, उद्योगमंत्री