देवद, पनवेल येथील सनातनच्या आश्रमाच्या मागील बाजूस एक पुरातन शिवमंदिर आहे. या मंदिराविषयी आश्रमातील साधक श्री. शंकर राजाराम नरुटे (आध्यात्मिक पातळी ६६ टक्के, वय ४१ वर्षे) यांना जाणवलेली सूत्रे पुढे दिली आहेत.

१. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी दुर्लक्षित अशा शिवमंदिराचे ओळखलेले माहात्म्य

१ अ. सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांनी शिवमंदिर पाहून साधकांना त्याची देखभाल करण्याविषयी सांगणे : ‘देवद, पनवेल येथे ‘सनातनच्या आश्रमा’ची निर्मिती होणार होती. तेव्हा तेथे (साधारण वर्ष २०००-२००१ मध्ये) पूर्ण जंगलच होते. गाढी नदीच्या बाजूची जागा पडीक होती. त्या वेळी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले देवद, पनवेल येथील जागा पहाण्यासाठी आले होते. तेव्हा ते तेथील ओसाड भागात आणि झाडीत असलेल्या या शिवमंदिराजवळ गेले. आश्रमाची जागा पहाण्याआधीच त्यांची पावले या शिवमंदिराकडे वळली होती ! त्या वेळी मंदिरात स्वच्छता, दैनंदिन पूजा आदी काहीही होत नव्हते. गुरुदेव मंदिरात पोचले आणि त्यांनी साधकांना सांगितले, ‘‘पुढे या मंदिराची देखभाल आपल्याला करायची आहे’, असे साधकांना सांगा.’’
१ आ. सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांच्या आज्ञेनुसार साधकांनी भक्तीभावाने पूजा केल्यामुळे मंदिरात चैतन्याचे प्रमाण अधिक जाणवणे : ‘साधकांनी मंदिरातील सेवा करावी, त्यांना भगवान शिवाचा आशीर्वाद प्राप्त व्हावा आणि त्यांची साधनेत प्रगती व्हावी’, या दृष्टींनी सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांनी सांगितलेले हे शब्द, म्हणजे त्यांचा आशीर्वादच होता. तोच आशीर्वाद आज साधकांना प्राप्त होत आहे. साधक मंदिरातील शिवाची पूजा भक्तीभावाने करतात. त्यामुळे तेथे चैतन्याचे प्रमाण अधिक जाणवते.
२. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी मंदिराच्या संदर्भात केलेले सुनियोजन
अ. ‘या मंदिराची दैनंदिन पूजा आणि देखभाल चांगल्या प्रकारे व्हावी’, या दृष्टीने श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी कार्यपद्धत घालून दिली आहे.
आ. मंदिराचा जीर्णोद्धार करण्याच्या दृष्टीने मंदिराचे बांधकाम करणार्या साधकांनाही त्यांनी मार्गदर्शन केले आहे.
३. संत आणि सद्गुरु यांनी शिवमंदिरात जाऊन पूजा, अभिषेक, ध्यान इत्यादी करणे
अ. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी स्वतः शिवपिंडीवर अभिषेक करून पूजा केली आहे. त्यामुळे या मंदिरातील चैतन्य अधिक प्रमाणात कार्यरत झाले आहे. उच्च पातळीच्या संतांनी अभिषेक करून समष्टीसाठी आशीर्वाद मागितल्यावर देव तो देतोच. त्यामुळे ‘सनातनच्या सर्व साधकांना आशीर्वाद प्राप्त झाला आहे’, असे मला जाणवले. तेव्हापासून या मंदिरात साधकांना अनुभूती येत आहेत.
आ. वेळोवेळी अनेक संतांनीही त्या ठिकाणी जाऊन ‘पूजा, अभिषेक, ध्यानधारणा, नामजप’ इत्यादी केले आहे. त्यामुळेही या शिवमंदिरातील चैतन्य वृद्धींगत होत आहे.
४. शिवमंदिरात आलेल्या अनुभूती

अ. सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी या मंदिरात जाऊन काही वेळ ध्यान लावले होते. त्या वेळी त्यांना ध्यानातून ‘शिवमंदिरात मोठी पोकळी आहे आणि तिच्यातून सर्वत्र चैतन्य प्रक्षेपित होत आहे’, असे त्यांना जाणवले होते.
आ. या मंदिरात गेल्यावर साधकांना ‘शांत वाटणे, मन एकाग्र होणे आणि उत्साह वाढणे’, अशा अनुभती येतात.
इ. बाहेरून येणार्या भक्तांनाही मंदिरातील चैतन्याची प्रचीती आली आहे. अनेक जण मंदिरात नवस बोलतात आणि त्यांचे नवस पूर्ण होतात. नंतर ते भक्त नवस पूर्ण करतात.
५. सनातन संस्थेच्या ठिकाणी भगवंताचे अधिष्ठान असणे, आश्रम आणि सेवाकेंद्रे यांच्या आसपास असलेल्या मंदिरांमुळे आश्रमांना धर्मकार्य करण्यासाठी देवतांचे चैतन्य अन् शक्ती मिळत असणे

सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांनी ज्या ज्या ठिकाणी आश्रमांची निर्मिती केली आहे, त्या त्या ठिकाणी साधकांना चैतन्याचा स्रोत मिळावा, यासाठी तेथे भगवंताचे मंदिर आहे. देवद येथील आश्रमाच्या मागे शिवमंदिर आहे. रामनाथी, गोवा येथील आश्रमाच्या बाजूला रामनाथ देवस्थान, म्हणजेच शिवमंदिरच आहे. अन्य आश्रम किंवा सेवाकेंद्रे यांच्या आसपासही वेगवेगळ्या देवतांची मंदिरे आहेत. यातून मला असे जाणवते की, ‘सनातन संस्थेच्या ठिकाणी भगवंताचे अधिष्ठान आहे. त्यामुळे देवता त्या त्या ठिकाणचे आश्रम आणि सेवाकेंद्रे यांना चैतन्य पुरवतात अन् धर्मकार्य करण्यासाठी शक्ती देतात !’
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची शिकवण, तसेच त्यांचे कार्य हे सगुणातून निर्गुणाकडे जाण्याचा मार्ग दाखवून सर्वांचा उद्धार करणे, हेच आहे. ते स्वतःच शिवस्वरूप असल्याची साधकांनी अनुभूती घेतली आहे आणि संतांनीही तसे सांगितलेले आहे. त्यामुळे साधकांना शिवतत्त्वाची अनुभूती येते.
शिवस्वरूप गुरुमाऊलींच्या चरणी आणि भगवान शिवशंकराच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’
– श्री. शंकर राजाराम नरुटे (आध्यात्मिक पातळी ६६ टक्के, वय ४१ वर्षे), सनातन आश्रम, देवद, पनवेल. (६.२.२०२६)
|

साधनेचे अद्वितीयत्व जाणून घ्या !
‘उत्तरदायी साधिकेच्या माध्यमातून गुरुतत्त्व कार्यरत असते’, असा भाव ठेवून संहिता (स्क्रिप्ट) लेखनाची सेवा करतांना साधिकेला झालेले लाभ आणि तिने अनुभवलेली गुरुकृपा !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असलेले शिरोडा, गोवा येथील श्री. धर्मा नाईक (वय ७५ वर्षे) !
पू. रमानंद गौडा (सनातनचे ७५ वे समष्टी संत, वय ५० वर्षे) यांचा साधकांना लाभलेला चैतन्यमयी सत्संग आणि त्या सत्संगात साधकांनी अनुभवलेले भावविश्व !
‘संगीतातील केवळ ७ स्वरांतून सर्व भाव-भावना कशा व्यक्त होतात ?’, या संदर्भातील आध्यात्मिक विश्लेषण !
चित्रपटसृष्टीतील वलयांकित जगाच्या मोहाला न भुलता आयुष्यभर अविरतपणे नाट्यसेवा करणारे प्रामाणिक नाट्यकर्मी ६७ टक्के आध्यात्मिक पातळीचे पद्मश्री (कै.) प्रसाद सावकार !