
आपण जी साधना करतो तिच्यामागे स्वतःचा हेतू देवाच्या कृपेचा असतो आणि ईश्वरी कृपा ही आपल्या सेवेतून ईश्वराला समाधान झाल्यासच प्राप्त होते. आपल्या कार्याला यश येणे, दुष्कर्म करण्याच्या विचारांपासून आपले मन मागे फिरणे, आपल्या व्यवसायात यश येऊन भरपूर द्रव्य मिळणे, आपल्या कुटुंबातील सर्वांचा परस्पर प्रेमभाव असणे आणि सर्वजण निरोगी, सदाचारी असणे इत्यादी व्यावहारिक गोष्टी ईश्वरीकृपेविना यशस्वी होत नाहीत अन् ती ईश्वरीकृपा आपल्या मनातील प्रामाणिक भगवद्भक्तीविना होऊ शकत नाही. कुठेतरी लक्ष देऊन नुसतेच तोंडाने नाम घेत बसले, तर देवाला आवडत नाही. जेव्हा तुम्ही नाम घेता, तेव्हा तो तुमच्या मनासमोर असला पाहिजे आणि जीवनात सर्वांत मोठी प्राप्ती ईश्वरकृपा हीच आहे. माझ्या जीवनात अनेक तीर्थयात्रांमध्ये अनेक वेळा सहभागी होण्याची संधी मला लाभली. मी अनेक नोकर्या सोडल्या; पण एक सोडली, की दुसरी लगेच हाती यायची. माझ्या जीवनात अत्यंत एकरूपतेने वागणारी, कधीही कोणत्याही विषयात विरोध न करणारी आणि माझा प्रत्येक शब्द उचलून धरणारी अत्यंत सुशील पत्नी भगवंताने मला दिली. त्यामुळे जीवन आनंदमय झाले. काहीप्रसंगी साक्षात्कारही घडले. हेच ईश्वरकृपेचे मुख्य पुरावे आहेत.
– भारताचार्य पू. प्रा. सु.ग. शेवडे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
साधकांनो, शब्दशक्तीच्या माध्यमातून विकल्प पसरवण्यासाठी कार्यरत असलेल्या सातव्या पाताळातील मोठ्या वाईट शक्तींचा डाव ओळखून साधना वाढवा !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांनी निर्मिलेला साधनामार्ग गुरुकृपायोग !
अर्पणदात्यांनो, गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने धर्मकार्यार्थ धन अर्पण करून गुरुतत्त्वाचा लाभ करून घ्या !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी त्यांचे ग्रंथलिखाण आणि सनातनच्या काही साधकांना मिळणारे सूक्ष्म ज्ञान यांच्या संदर्भात विचारलेल्या प्रश्नांचे सूक्ष्म ज्ञानातून उलगडलेले आध्यात्मिक विश्लेषण !
सनातन संस्थेच्या साधकांचे एक वेगळे वैशिष्ट्य : गुरुकृपेने सूक्ष्मातील जाणू शकणे !
गुरूंचे माहात्म्य अन् शिष्याची गुरुभक्ती