‘व्हॅलेंटाईन डे’निमित्त करण्यात आले होते आयोजन !

अहिल्यानगर – शहरातील टायटन शोरूमजवळ असलेल्या ‘शॉर्ट ब्रेक कॅफे’ येथे १४ फेब्रुवारी या दिवशी असलेल्या ‘व्हॅलेंटाईन डे’च्या निमित्ताने आयोजित केलेल्या ‘सनडाऊनर कॉफी रेव्ह पार्टी’ कार्यक्रमास हिंदु जनजागृती समितीसह विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी तीव्र विरोध दर्शवला. यामुळे हा कार्यक्रम रहित करण्यात आला आहे.
🚨 “Coffee Rave Party” CANCELLED in Ahilyanagar 🚨
A Valentine’s Day–themed “Coffee Rave Party” at Short Break Cafe, Ahilyanagar, was called off after strong opposition from Hindutva groups, including @HinduJagrutiOrg
Western-style rave culture, once limited to metros like… pic.twitter.com/UBDDLfEaDH
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) February 11, 2026
संबंधित इन्स्टाग्राम पृष्ठावरील कार्यक्रमाचे विज्ञापन हटवण्यात आले आहे. ‘हा हिंदूंच्या एकजुटीचा विजय आहे. समाजविघातक कार्यक्रम रोखणे, हे संस्कृतीरक्षण आहे’, अशी भूमिका हिंदु जनजागृती समितीचे जिल्हा समन्वयक श्री. रामेश्वर भुकन यांनी मांडली.

१. हिंदु जनजागृती समितीसह विविध संघटनांच्या पदाधिकार्यांनी अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया आणि पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांना निवेदनाद्वारे ‘कार्यक्रमास अनुमती देऊ नये किंवा दिलेली अनुमती रहित करावी’, अशी मागणी केली.

२. रेव्ह पार्ट्यांमध्ये गांजा, चरस आणि कोकेन यांसारख्या अमली पदार्थांचा वापर होतो. कायद्याने अशा पदार्थांवर बंदी असूनही अशा कार्यक्रमांमुळे अमली पदार्थांची विक्री केली जाते. अहिल्यानगर हे शिक्षणाचे केंद्र असून येथे मोठ्या संख्येने विद्यार्थी रहातात. रेव्ह पार्ट्यांमुळे युवकांमध्ये व्यसनाधीनता वाढून त्यांच्या भवितव्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. मद्य आणि अमली पदार्थ यांच्या प्रभावाखाली महिलांची छेड काढणे, अत्याचार किंवा अश्लील चित्रीकरण आदींतून कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो, असेही निवेदनात सांगण्यात आले.
हिंदु जनजागृती समितीचे प्रसिद्धीपत्रक !
३. निवेदन देण्यासाठी बजरंग दलाचे श्री. नाना मोरे, हिंदु राष्ट्र समन्वय समितीचे श्री. अजिंक्य गायकवाड, ‘हिंदु टाईम्स’च्या संपादिका सौ. स्नेहा जोशी, हिंदु जनजागृती समितीचे जिल्हा समन्वयक श्री. रामेश्वर भुकन, समितीचे जिल्हा हिंदु संघटक श्री. बापू ठाणगे, भाजप महिला मोर्चाच्या राज्य सचिव सौ. गीता गिल्डा, भाजप कार्यालय मंत्री श्री. मुकुल गंधे, महाराष्ट्र मंदिर महासंघाचे श्री. भरत शिंदे, श्री. सुनील शिंदे, रणरागिणी शाखेच्या सौ. सुरेखा विद्ये, सामाजिक कार्यकर्ते श्री. दिनेश जोशी, श्री. रवी गाली आदी उपस्थित होते.
४. निवेदनाची नोंद घेऊन जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांनी कारवाई करण्याचे आश्वासन दिले. हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या प्रयत्नांमुळे रेव्ह पार्टी रहित झाली, यासाठी सर्व संघटनांचे आभार मानून ईश्वरचरणी कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.
संपादकीय भूमिका
|
पाकिस्तानशी संबंधित ‘रील्स’ पाहिल्यामुळे अहिल्यानगर येथील तरुणांची चौकशी !
वाढत्या वायू प्रदूषणामुळे पुढील ३० वर्षांत २ अंशांपर्यंत तापमानवाढीचे संकट !
गोव्यात शैक्षणिक वर्ष पुन्हा जूनपासून चालू करण्याचा प्रस्ताव
‘सनबर्न’च्या आयोजकांना दणका : सुरक्षा ठेव रक्कम जप्त करण्यास राष्ट्रीय हरित लवादाची मान्यता
आहारात साखर, तेल अल्प करा आणि व्यायामावर भर द्या ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री