
स्वातंत्र्याला ७८ वर्षे पूर्ण झाल्यानंतर केंद्रशासनाने ‘वन्दे मातरम्’ शाळा, महाविद्यालय, सरकारी कार्यक्रम यांमध्ये म्हणणे बंधनकारक केले आणि तेही राष्ट्रगीत ‘जन गण मन’ याच्यापूर्वी ! मोदी सरकार येण्यापूर्वी देशात काँग्रेस आणि अन्यही विरोधी पक्षांची सरकारे आली; मात्र कुणीही वन्दे मातरम् अनिवार्य केले नव्हते आणि मोदी सरकार येऊनही ११ वर्षांनंतर ते अनिवार्य करण्यात आले. काही वर्षांपूर्वी याला राष्ट्रीय गीताचा दर्जा देण्यात आला; मात्र आताच्या निर्णयातून जे वन्दे मातरम् भारतीय स्वातंत्र्यासाठी स्वातंत्र्यसैनिक, क्रांतीकारक यांचा मंत्रघोष होता, त्याचे कार्य आज खर्या अर्थाने पूर्ण झाले, असे म्हणावे लागले. सध्याचे वर्ष या गीताचे १५० वे वर्ष म्हणून साजरे केले जात आहे. त्यामुळे हा एक चांगला निर्णय झाला आहे. मुळात वन्दे मातरम् भारताचे राष्ट्रगीत होणे आवश्यक होते; मात्र तत्कालीन काँग्रेस सरकार, नेहरू यांनी मुसलमानांच्या लांगूलचालनामुळे आणि क्रांतीकारकांविषयीच्या द्वेषामुळे या गीताला राष्ट्रगीताचा दर्जा दिला नाही. ‘वन्दे मातरम् नीट म्हणता येत नाही, त्याला चाल लावता येत नाही’, असे सांगून नेहरूंनी त्याला त्या वेळी विरोध केला होता. हे आव्हान पंडित पलुस्कर यांनी स्वीकारून त्याला छान चाल लावली आणि ती देशासमोर मांडली; मात्र हिंदुद्वेषी नेहरूंनी काहीतरी कारण सांगायचे म्हणून चालीचा विषय सांगितल्याने त्यांचा विरोध कायमच राहिला होता. ‘जन गण मन’ ब्रिटनच्या राजाच्या स्वागतासाठी लिहिलेले गीत असल्याचा आरोप करत त्याला राष्ट्रगीत करण्याला त्या वेळी विरोध करण्यात आला होता. अशा वेळी वन्दे मातरम् राष्ट्रगीत करता आले असते; मात्र तसे झाले नाही. ‘इतक्या वर्षांनंतर ते पालटून वन्दे मातरम् राष्ट्रगीत घोषित करता आले असते का ?’, असेही कुणाच्या मनात येऊ शकते; मात्र तशी चर्चा देशात झाली पाहिजे. दुसरीकडे इतक्या वर्षांत सरकारी स्तरावर वन्दे मातरम्ला योग्य सन्मान देण्यात आला नाही, तरी प्रत्येक भारतियाच्या (मुसलमान आणि अन्य काही धर्मीय वगळून) मनात वन्दे मातरम् कोरले गेले असल्याने ते त्यांच्या ओठावर नेहमीच येत राहिले आणि त्याला जिवंत ठेवण्यात आले.

श्री दुर्गादेवीला विरोध
स्वातंत्र्यपूर्व काळात काँग्रेसच्या अधिवेशनात आणि अन्य सभांच्या वेळीही वन्दे मातरम् गायले जात होते; मात्र त्यामध्ये एका कडव्यात श्री दुर्गादेवीचा उल्लेख असल्याने पहिली दोनच कडवी गाण्यात येऊ लागली. ‘मुसलमानांच्या भावना दुखावल्या जातील’, या कारणाने इतर कडवी न गाण्याचा निर्णय काँग्रेसकडून घेतला गेला. याला काहींनी विरोध केला; पण त्याचा काही परिणाम झाला नाही. श्री दुर्गादेवीचा उल्लेख त्याला राष्ट्रगीत न करण्याचेही एक कारण म्हटले जाते.
मुसलमानांचा विरोध
मुसलमान नेहमीच वन्दे मातरम्ला विरोध करत राहिले आणि आजही करत आहेत. मुसलमान ‘वन्दे मातरम्’ म्हणण्यास नकार देतात. आता सरकारच्या निर्णयानंतरही ओवैसी यांसारख्या नेत्यांनी विरोध केला आहेच; पण मुसलमानांचे तळवे चाटणार्या समाजवादी पक्षासारख्या पक्षांनीही याला विरोध केला आहे. यातून लक्षात येते की, या राजकीय पक्षांमध्ये देशापेक्षा राजकीय स्वार्थ किती मुरलेला आहे. ‘असे पक्ष कधीतरी भारतमातेशी एकनिष्ठ राहू शकतील का ?’,
असा प्रश्न उपस्थित होतो. आता पुढचा प्रश्न असा असणार आहे की, वन्दे मातरम् म्हणणे अनिवार्य केल्याने मुसलमान कसे वागतात ?, हे पहावे लागेल आणि त्यांनी ते गायले नाही, सन्मान दिला नाही, तर देशात काय घटना घडतात, हेही पहावे लागेल. कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो, त्यामुळे सतर्क रहाण्याची आवश्यकता हिंदूंसह पोलिसांनाही असणार आहे.
अनिवार्यतेचे लाभ !
भारतीय राजकारणात आणि समाजमनात ‘वन्दे मातरम्’ या शब्दांना केवळ अक्षरांचे संकलन न मानता एका जिवंत ऊर्जेचा स्रोत मानले गेले आहे. सरकारचा तो अनिवार्य करण्याचा निर्णय केवळ एक प्रशासकीय आदेश नाही, तर तो भारताच्या सांस्कृतिक गाभ्याला स्पर्श करणारा एक धाडसी प्रयत्न आहे. क्रांतीकारकांसाठी ‘वन्दे मातरम्’ हा फासावर जातांना दिलेला मंत्र होता. तो त्यांच्या रक्तात होता, केवळ ओठांवर नाही. तो त्यांच्या जगण्या-मरण्याचा आधार होता. भगतसिंह, सुखदेव, राजगुरु असोत वा मदनलाल धिंग्रा, हे फासाच्या दोराकडे जातांना त्यांच्या ओठांवर ‘वन्दे मातरम्’चा जयघोष असायचा. बंगालच्या फाळणीच्या वेळी (वर्ष १९०५) ब्रिटिशांनी ‘वन्दे मातरम्’ घोषणेवर बंदी घातली होती. तरीही अंगावर पडणार्या प्रत्येक लाठीसमवेत क्रांतीकारकांचा आवाज अधिक बुलंद होत असे. शाळेत किंवा कार्यालयात वन्दे मातरम् म्हणतांना भावही आणणे आवश्यक ठरणार आहे. तो भाव या गीतातील शब्दांतूनच निर्माण होणार यात शंका नाही. राष्ट्रभक्ती ही एखाद्या बीजासारखी असते, जी अंतःकरणाच्या मातीत आपोआप रुजली पाहिजे. एखाद्या गोष्टीची सक्ती केली, तर ती जनता स्वीकारत नाही, व्यक्ती स्वीकारत नाही; मात्र येथे ‘वन्दे मातरम् अनिवार्य करावे’, अशी कोट्यवधी हिंदूंची मागणी अनेक दशके होती. जगाच्या इतिहासात असे कोणतेही गीत नसेल, जे इतकी वर्षे जनतेच्या मनात आणि ओठात देशाप्रतीचा उत्कट भाव निर्माण करत आहे अन् ते अनिवार्य करण्यासाठी प्रयत्नरत आहे. ‘वन्दे मातरम्’ हे संस्कृतप्रचुर बंगाली भाषेत आहे. तरीही देशातील जनतेला त्याचे वेगळेपण जाणवत नाही; कारण देशातील प्रत्येक व्यक्ती (मुसलमान वगळून) या मातीशी जोडलेली आहे आणि या मातीप्रतीची कृतज्ञता कुठल्या गीतातून व्यक्त होत असेल, तर तेथे प्रत्येक जण (मुसलमान वगळून) नतमस्तक होतोच. तेथे भाषेचा कोणताही प्रश्न उपस्थित होत नाही. ‘वन्दे मातरम्’ हे केवळ शब्दांचे संकलन नसून तो आपल्या पूर्वजांच्या बलीदानाचा इतिहास आहे.
गीताचे भाव शिकवा !
बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी वर्ष १८८२ मध्ये ‘आनंदमठ’ या कादंबरीतून वन्दे मातरम् गीत जगासमोर आणले. त्या काळात समाज निराश, आर्थिकदृष्ट्या पीडित आणि मानसिकदृष्ट्या गुलामगिरीच्या ओझ्याखाली दबलेला होता. अशा वेळी वन्दे मातरम् या गीताने भारतियांच्या अंतःकरणात सुप्त असलेली राष्ट्रभक्ती जागृत केली. आज हे गीत अनिवार्य करतांना या गीताचा अर्थ शाळांमध्ये शिकवला गेला पाहिजे. प्रत्येक कडव्यातून भारतमातेविषयी काय भाव व्यक्त करण्यात आला आहे, हे सांगितले गेले पाहिजे, यातून भारताच्या पुढच्या पिढीमध्ये देशभक्तीची ज्योत अखंड तेवत राहील. ‘वन्दे मातरम् !’
| ‘वन्दे मातरम्’ अनिवार्य झाले, याचा आनंद व्यक्त करतांना भविष्यात त्यालाच राष्ट्रगीत करण्याचाही प्रयत्न करणे आवश्यक आहे ! |
संपादकीय : मंदिरे अध्यात्मासाठीच !
हिंदूविरोधी ‘देवस्थान इनाम जमीन निर्मूलन अधिनियम’ रहित करावा !
तुमकुरू (कर्नाटक) येथे श्रीराममंदिराच्या शेजारी अल्पसंख्यांकांचे वसतीगृह बांधण्याचा डाव !
Corporate Jihad SUD Life Insurance : विमा आस्थापनेतील मुसलमान व्यवस्थापकाकडून हिंदु तरुणीचा छळ !
बेंगळुरूमध्ये कचरा वेचणार्या सैबुलने विद्यार्थिनीवर केला बलात्काराचा प्रयत्न !
Abu Azmi : (म्हणे) ‘लव्ह जिहाद’, ‘लँड जिहाद’ या सर्व मूर्खपणाच्या गोष्टी !