कायद्यानुसार धर्माचे शिक्षण देणे अयोग्य असल्याचे न्यायालयाने केले स्पष्ट
थिरुवनंतपूरम् (केरळ) – केरळ उच्च न्यायालयाने त्रिशूर जिल्ह्यातील एक खासगी शाळा बंद करण्याचा आदेश दिला आहे. या शाळेत सुमारे ३०० मुलांना कुराण शिकवले जात होते. आवश्यक मान्यता नसतांना शाळा चालवली जात असल्याने ‘शिक्षणाचा अधिकार कायद्या’चे उल्लंघन झाल्याचे न्यायालयाने नमूद केले आणि शाळा बंद करण्याचे निर्देश दिले. चालू शैक्षणिक वर्ष २०२५-२६ संपेपर्यंत शाळा चालू ठेवण्याची मुभा देण्यात आली, जेणेकरून मुले आणि पालक यांना पर्यायी व्यवस्था करण्यासाठी काही कालावधी मिळू शकेल. त्यानंतर शाळा बंद केली जाईल, असे न्यायालयाने स्पष्ट केले.
⚖️ Kerala HC Order: The Kerala High Court has ordered the closure of a private school for teaching the Quran to children.
🚫 The court emphasized that providing exclusive religious instruction in such a manner is inconsistent with the law. 📖
#KeralaHighCourt #EducationLaw… pic.twitter.com/QaL0sOljSb
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) February 9, 2026
न्यायालयाने स्पष्ट केले की,
१. शाळेने ‘शिक्षणाचा अधिकार कायदा, २००९’ मधील कलम १८ चे उल्लंघन केले आहे. राज्य सरकारकडून आवश्यक मान्यता न घेता शाळा चालवली जात असल्याचे आढळले. कायद्यानुसार प्रत्येक शाळेला राज्य सरकारची मान्यता घेणे बंधनकारक असल्याचे न्यायालयाने अधोरेखित केले.
२. शाळा प्रशासनाने राष्ट्रीय मुक्त शिक्षण संस्थेकडील मान्यता असल्याचा दावा केला; मात्र या संस्थेची मान्यता शिक्षणाच्या अधिकाराच्या कायद्याअंतर्गत आवश्यक असलेल्या मान्यतेचा पर्याय ठरू शकत नाही, असे उच्च न्यायालयाने स्पष्ट केले.
३. शिक्षणाच्या अधिकाराच्या कायद्याअंतर्गत मान्यता मिळाल्यानंतरही राज्य सरकारची विशेष अनुमती नसतांना कोणतीही शाळा एका धर्माचे एकतर्फी धार्मिक शिक्षण देऊ शकत नाही. या कारणांमुळे ही शाळा कायदेशीररित्या चालवली जात नसल्याचा निष्कर्ष काढत तिला बंद करणेच योग्य ठरेल, असे न्यायालयाने सांगितले.

संपादकीय : पारपत्राचा अनावश्यक गोंधळ !
लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात पीडित धर्मांध मुलांना प्रत्येकी १० लाख रुपये हानीभरपाई देण्याचा मद्रास उच्च न्यायालयाचा आदेश !
अत्याचार केल्याप्रकरणी धर्मांधाला सश्रम कारावास आणि दंड !
निकृष्ट दर्जाच्या सुपारीवर अन्न आणि औषध प्रशासनाची कारवाई
नर्हे (पुणे) येथे प्रतिबंधित गुटखा कह्यात : दोन धर्मांध कह्यात
मुख्य आरोपींवर ‘मकोका’ अंतर्गत कारवाई करणार !