|

लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख आणि उत्तरप्रदेशाच्या माजी मुख्यमंत्री मायावती यांनी ब्राह्मण समाजाच्या अपमानाविषयी चिंता व्यक्त केली आहे. ‘घूसखोर पंडित’ (भ्रष्टाचार करणारा ब्राह्मण) या ‘नेटफ्लिक्स’ या ओटीटी (‘ओव्हर द टॉप’ ! आस्थापनांनी थेट इंटरनेटद्वारे दर्शकांसाठी दिलेली सेवा म्हणजे ‘ओटीटी’) मंचावरील चित्रपटावर बंदी घालण्याची मायावती यांनी मागणी केली आहे. त्या म्हणाल्या की, अलीकडच्या काळात केवळ उत्तरप्रदेशातच नव्हे, तर आता चित्रपटांमधूनही ‘पंडित’ या शब्दाला भ्रष्टाचारी म्हणून दाखवून देशभर ब्राह्मणांचा अपमान केला जात आहे. यामुळे ब्राह्मण समाजात तीव्र संताप आहे. अशा जातीसूचक चित्रपटावर केंद्र सरकारने तात्काळ बंदी घालावी. या चित्रपटाचे निर्माते नीरज पांडे आणि मुख्य भूमिका मनोज वाजपेयी यांनी केली आहे. विशेष म्हणजे हे दोघेही ब्राह्मण आहेत. (ब्राह्मण जातीचे निर्माते आणि अभिनेतेच अशा प्रकारे ब्राह्मणांचा अपमान करत असतील, तर यातून धर्मशिक्षणाची ब्राह्मणांनाही किती आवश्यकता आहे, हे लक्षात येते ! – संपादक)
Ban ‘Ghooskhor Pandat’ for insulting Brahmins
Film on Netflix features Manoj Bajpayee as a corrupt cop named Ajay Dixit
• Outrage grows across the Hindu community; even BSP chief Mayawati has demanded action
👉 This isn’t about a few voices; the entire Hindu community must… pic.twitter.com/r7N5itj9Dj
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) February 6, 2026
भाजप खासदार आणि माहिती तंत्रज्ञान विषयक स्थायी समितीचे अध्यक्ष असलेले निशिकांत दुबे यांनी यावर म्हटले की, विषयावर चर्चा झाल्यानंतरच याविषयी मला काही सांगता येईल.
यह बड़े दुख व चिन्ता की बात है कि पिछले कुछ समय से अकेले यू.पी. में ही नहीं बल्कि अब तो फिल्मों में भी ’पंडत’ को घूसखोर आदि बताकर पूरे देश में जो इनका अपमान व अनादर किया जा रहा है तथा जिससे समूचे ब्राह्मण समाज में इस समय ज़बरदस्त रोष व्याप्त है, इसकी हमारी पार्टी भी कड़े शब्दों…
— Mayawati (@Mayawati) February 6, 2026
काँग्रेसचाही विरोध
काँग्रेसचे उत्तरप्रदेश अध्यक्ष अजय राय यांनी चित्रपटाला ब्राह्मणविरोधी म्हणत भाजपवर टीका केली आहे. भाजप पूर्वीचे हिंदु-मुसलमान असे राजकारण करत होता आणि आज जातीचे राजकारण करत आहे, असा आरोप राय यांनी केला.
उत्तरप्रदेश पोलिसांकडून गुन्हा नोंद !
याआधी हजरतगंज पोलीस ठाण्यात ‘घूसखोर पंडित’ चित्रपटाचे निर्माते, दिग्दर्शक, अभिनेते आदींच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. लक्ष्मणपुरी पोलीस आयुक्तालयाकडून दिलेल्या निवेदनात समाजातील सौहार्द बिघडवणार्या, तसेच धार्मिक आणि जातीय भावना दुखावणार्या कृतींच्या विरोधात कठोर कारवाई केली जाईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे. कोणत्याही समुदायाच्या भावना दुखावणार्या आणि कायदा-सुव्यवस्थेशी खेळ करणार्या घटकांविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही देण्यात आला आहे.
चित्रपट संघटना शिस्तभंगाची करू शकते कारवाई !
‘फिल्म मेकर्स संघटने’नेही ‘घूसखोर पंडित’च्या निर्मात्यांना नोटीस पाठवली आहे. चित्रपट निर्माते नीरज पांडे यांनी ‘घूसखोर पंडित’ हे शीर्षक वापरण्यासाठी अनुमती मिळवण्याचा अर्ज केला नव्हता. त्यामुळे अनुमतीखेरीज शीर्षकाचा वापर केल्यास शिस्तभंगाची कारवाई होऊ शकते.
अभिनेते मनोज वाजपेयी यांनी दिले स्पष्टीकरण !

विरोध वाढल्यानंतर चित्रपटाचे निर्माते नीरज पांडे आणि अभिनेते मनोज वाजपेयी यांनी संयुक्त निवेदन केले असून स्पष्टीकरण दिले आहे. वाजपेयी म्हणाले की, लोकांनी व्यक्त केलेल्या भावना आणि चिंता यांचा मी आदर करतो. मी त्या गंभीरपणे घेतो. आपण ज्या गोष्टीचा भाग आहात, त्यामुळे काही लोक दुखावले असतील, तर त्यांचे म्हणणे ऐकण्याची आवश्यकता निर्माण होते. कोणत्याही समुदायावर भाष्य करण्याचा उद्देश नव्हता.
I respect the emotions and concerns people have shared, and I take them seriously. When something you are part of causes hurt to some people, it makes you pause and listen.
As an actor, I come to a film through the character and the story I am playing. For me, this was about… https://t.co/IGlQtLQeNs
— manoj bajpayee (@BajpayeeManoj) February 6, 2026
जनतेच्या भावना लक्षात घेऊन चित्रपट निर्मात्यांनी प्रचार साहित्य हटवण्याचा निर्णय घेतला आहे. (ब्राह्मण जातीचे निर्माते आणि अभिनेतेच अशा प्रकारे ब्राह्मणांचा अपमान करत असतील, तर यातून धर्मशिक्षणाची ब्राह्मणांनाही किती आवश्यकता आहे, हे लक्षात येते ! – संपादक)
चित्रपटात मनोज वाजपेयी यांनी लाचखोर पोलीस अधिकारी अजय दीक्षित यांची भूमिका साकारली आहे.
केंद्र सरकारची नेटफ्लिक्सला नोटीस
चित्रपटाला होत असलेल्या विरोधानंतर केंद्र सरकारकडून नेटफ्लिक्स आस्थापनाला नोटीस बजावण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
संपादकीय भूमिका
|
म्यानमारचे राष्ट्राध्यक्ष यू मिन आंग ह्लाईंग यांचे मुंबईत स्वागत !
Ramdas Athawale : (म्हणे) ‘हातभट्ट्या अधिकृत केल्यास सरकारला महसूल मिळेल !’
मुंबईत उबेरच्या चालकाकडून तरुणीशी गैरवर्तन
गोरेगाव येथे सरकारी भूमीवरील अवैध दर्गा भुईसपाट !
शासकीय कार्यालयांत ‘केवळ नामधारी’ ही मराठी भाषा अधिकार्यांची ओळख पुसण्यासाठी होणार प्रयत्न !
Khan Sir Coaching Firing : पाटलीपुत्र (बिहार) येथे प्रसिद्ध खान सर यांच्या शिकवणी वर्गावर आक्रमण