
कर्णावती (गुजरात) – इस्लाम आणि पैगंबर यांच्या विरोधात बोलणार्या ७ लोकांची सूची बनवून त्यांच्या हत्या करण्याचा कट रचल्याच्या प्रकरणी गुजरात आतंकवादविरोधी पथकाने फैजान शेख नावाच्या व्यक्तीला अटक केली. फैजान मूळचा उत्तरप्रदेशातील रामपूरचा रहिवासी असून तो नवसारी येथे शिंप्याचे काम करत होता.
आतंकवादविरोधी पथकाच्या अन्वेषणात असे समोर आले आहे की, फैजान शेख याच्यावर प्रतिबंधित आतंकवादी संघटना जैश-ए-महंमद आणि अल्-कायदा यांच्या धर्मांध विचारसरणीचा प्रभाव होता. फैजानच्या चौकशीतून असे समोर आले की, तो पैगंबर यांच्या विरोधात विधान करणार्यांची माहिती गोळा करत होता. त्याने देहली आणि उत्तरप्रदेश येथील लोकांची एक सूची सिद्ध केली होती. हत्येसाठी त्याने कपडे शिवून कमावलेल्या पैशांतून ‘रिव्हॉल्व्हर’ही विकत घेतले होते; मात्र आतंकवादविरोधी पथकाने त्याची ही योजना प्रत्यक्षात येण्यापूर्वीच त्याला पकडले. त्याच्याकडून उर्दू आणि अरबी भाषेत लिहिलेली २९ पानेही जप्त करण्यात आली असून त्यांची पडताळणी चालू आहे.
फैजान याने ७ जणांच्या नावांची सूची बनवली होती. यात अभिषेक ठाकूर, दक्ष चौधरी, गौरव राजपूत, डॉ. प्रकाश, युधि राणा, अक्कू पंडित आणि विक्रांत यांची नावे आहेत.
संपादकीय भूमिकामुसलमान त्यांच्या धर्माविषयी सतर्क असल्याने कुणी त्यांच्या धर्माचा अवमान केल्यास त्याला धडा शिकवण्यासाठी ते कोणत्याही थराला जाण्यासाठी तत्परत असतात, तर हिंदू स्वतःच स्वतःच्या धर्माचा अवमान करतात ! |
संपादकीय : पारपत्राचा अनावश्यक गोंधळ !
घरफोडी करणारा सराईत गुन्हेगार अटक !
श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या अपीलाची सुनावणी अन्य जिल्हा न्यायाधीश यांचेकडे वर्ग होणार !
देशातील ३ राज्यांत लव्ह जिहादच्या ४ घटना उघड !
तेलंगाणातील महिला तहसीलदाराची २० कोटी रुपयांची बेहिशोबी मालमत्ता जप्त !
Kanishka Blast : वर्ष १९८५ मध्ये एअर इंडियाच्या ‘कनिष्क’ विमानात खलिस्तानी आतंकवाद्यांनी स्फोट केला !