सनातन संस्था, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, हिंदु जनजागृती समिती, गीता परिवार अशा अनेक हिंदुत्वनिष्ठ संघटना, तसेच योगगुरु बाबा रामदेव, आचार्य धीरेंद्र शास्त्री, साध्वी प्रज्ञा, साध्वी ऋतंभरा यांसह सन्माननीय नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधान म्हणून सलग, सातत्यपूर्ण आणि यशस्वी कारकीर्दीला तोड नाही. या सर्व गोष्टींचा परिणाम, म्हणजे हिंदूंमधील आत्मविश्वास वाढत असून हिंदु समाज जागृत आणि संघटित होऊ लागला आहे; पण हे अक्षम्य अशा धिम्या गतीने चालू आहे. ज्याचा लाभ राष्ट्र आणि हिंदु विरोधी तत्त्वांना होत आहे; कारण त्यांची विघातक गती आपल्या गतीच्या २० पट अधिक आहे. मग ती लोकसंख्या वाढ असो कि आणखी काही.
हिंदु आणि राष्ट्र विरोधी विघातक कृत्यांना आळा बसावा, असे वाटत असेल, तर हिंदू आणि राष्ट्रवादी यांची केवळ राष्ट्रीयच नव्हे, तर जागतिक पातळीवर एकच अशी जबरदस्त संघटना हवी; मात्र प्रत्येकाने आपापल्या वेगवेगळ्या चुली मांडलेल्या असल्याने हे कदापि शक्य नाही. तरीही पुढील गोष्टींचा जरी विचार झाला, तरी हे उद्दिष्ट बर्याच मोठ्या प्रमाणात साध्य होऊन हे सनातनी हिंदु राष्ट्र प्रगतीपथावर अग्रेसर होऊन ‘जगद्गुरु’ होऊ शकेल.

सर्व संघटना एकत्र आल्यास काय करता येईल ?
१. सरकारने राष्ट्रविरोधी शक्तींना आळा घालणारे कायदे अधिक सक्षम करून त्यांच्या काटेकोर कार्यवाहीकडे प्रकर्षाने लक्ष ठेवणे.
२. शैक्षणिक धोरणांत आमूलाग्र पालट करून बालपणापासूनच आध्यात्मिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक पाया रचणे.
३. सर्व हिंदुत्वनिष्ठ, राष्ट्रवादी, धर्म, पंथ आणि संघटनांनी एकत्र येऊन सर्वांचा एक मध्यवर्ती संघ स्थापन करणे. जो राष्ट्रीय हिताच्या किमान सूत्रांवर एकत्र लढा देईल.
४. मध्यवर्ती संघाची तरुण, तडफदार लोकांची एक सशक्त अन् सशस्त्र शाखा असेल, जी ‘जशास तसे’ उत्तर देऊ शकेल.
५. सदर मध्यवर्ती संघाने सरकारच सर्व काही करील, ही अपेक्षा न बाळगता सरकारची मानसिकता लक्षात घेऊन निर्णय घेणे आणि ते प्रभावीपणे कार्यवाहीत आणणे.
असे जर झाले, तर कुणाचीही आपल्या राष्ट्राकडे वाकड्या दृष्टीने बघण्याची, आपल्या देवीदेवतांची टिंगलटवाळी करण्याची आणि आपल्या राष्ट्रीय प्रतिकांचा अपमान करण्याचे धाडस होणार नाही.
सनातन संस्था, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांसारख्या धार्मिक, राष्ट्रीय, सांस्कृतिक आणि सामाजिक संघटनांनी एका मंचावर येऊन हे महान कार्य केले, तर हे केवळ राष्ट्रीयच नव्हे, तर जागतिक हिताच्या दृष्टीने एक महत्त्वाचे पाऊल ठरेल, यात दुमत नाही.
– वीरभद्र महाजन, आबिटगाव, चिपळूण, जिल्हा रत्नागिरी.
संपादकीय : हिंदु राष्ट्राची चर्चा हवीच !
शांत, संयमी, दूरदर्शी नेतृत्व, विनम्रता आणि सेवाभाव यांचा आदर्श असलेल्या आदरणीय दीदी !
डॉक्टरांना (आधुनिक वैद्यांना) मारून कुणाचा जीव वाचणार ?
हिंदूंना शत्रूबोध नाही !
भारतातील ‘डेटा सेंटर्स’मुळे निर्माण होणारे जलसंकट !
न्यायालयातील भाषेचा अडथळा : ‘लॅटिन’ संज्ञांमुळे सामान्य माणूस भारतीय कायद्यापासून दूर जात आहे का ?