Close
आषाढ कृष्ण पक्ष द्वादशी, कलियुग वर्ष ५११९

सण-उत्सव

गोमय (गोबर) गणेशमूर्ती नव्हे, तर शास्त्रानुसार मातीचीच श्री गणेशमूर्ती बनवणे योग्य !

सध्या सामाजिक प्रसारमाध्यमांवरून (सोशल मीडियावरून) गणेशोत्सवात गोमय (गोबर) गणेशमूर्ती बनवण्याविषयी मोठ्या प्रमाणात प्रसार केला जात आहे. मात्र गोमय आणि गोमूत्र यांपासून बनवलेली श्री गणेशमूर्ती अशास्त्रीय आहे.

युगे २८ उभा विठु विटेवरी !

सत्य, त्रेता, द्वापर आणि कलि अशा चार युगांचे एक चक्र, म्हणजेच एक फेरा होतो. सध्या पृथ्वीतत्त्वाचा सातवा फेरा चालू आहे. ७ x ४ = २८. सध्या २८ वे युग चालू आहे. विठ्ठल २८ युगांपासून उभाच आहे.

वटपौर्णिमेच्या दिवशी सौभाग्यवती स्त्रीने करावयाचे वटपूजन आणि उपवास यासंबंधी निर्णय

या वर्षी ज्येष्ठ पौर्णिमा ही तिथी ८ जून या दिवशी दुपारी ४.१४ वाजता चालू होते आणि ९ जून या दिवशी ६.४० पर्यंत आहे. सूर्यास्तापूर्वी ६ घटिकांपेक्षा अधिक व्यापिनी अशा चतुर्दशीयुक्त पौर्णिमेला सावित्रीव्रत (वटपूजन) करावे, असे वचन आहे.

साडेतीन मुहुर्तांतील एक मुहूर्त असलेली आणि सुख-समृद्धी प्रदान करणारी अक्षय्य तृतीया !

अक्षय (अक्षय्य) तृतीया साडेतीन मुहुर्तांपैकी एक आहे. याच दिवशी त्रेतायुगाला प्रारंभ झाला. या दिवसाने एका कलहकालाचा अंत आणि दुसर्‍या युगाच्या सत्ययुगाचा प्रारंभ, अशी संधी साधलेली असल्यामुळे अक्षय (अक्षय्य) तृतीया या संपूर्ण दिवसाला ‘मुहूर्त’ म्हणतात.

अक्षय्य तृतीयेला करावयाच्या विविध कृतींमागील अध्यात्मशास्त्र

साडेतीन मुहुर्तांपैकी एक पूर्ण मुहूर्त असलेल्या अक्षय (अक्षय्य) तृतीयेला तीलतर्पण करणे, उदकुंभदान (उदककुंभदान) करणे, मृत्तिका पूजन करणे, तसेच दान देण्याचा प्रघात आहे.

अक्षय्य तृतीया साजरी करण्याची पद्धत

कालविभागाचा कोणताही प्रारंभदिवस भारतियांना नेहमीच पवित्र वाटतो; म्हणून अशा तिथीस स्नानदानादी धर्मकृत्ये सांगितली गेली आहेत.

भाविकांचे श्रद्धास्थान असलेला निमणी (सांगली) येथील नवश्या मारुति !

आज चैत्र पौर्णिमा – हनुमान जयंती ! तासगाव तालुक्यातील निमणी येथील श्री हनुमान मंदिर पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे. येथील मारुति नवसाला पावणारा असल्याने सहस्रो भाविक दर्शन घेण्यासाठी आज निमणी येथे येत असतात.

वाराणसी येथे हिंदु जनजागृती समितीकडून रामनवमी निमित्त मिरवणूक

हिंदु जनजागृती समितीद्वारे रामनवमीनिमित्त येथील गोरक्षनाथ मंदिर ते चित्तरंजन पार्क या मार्गावर मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीच्या आधी धर्मध्वज आणि श्रीरामाची प्रतिमा यांचे पूजन करण्यात आले.