भगवंताकडे केवळ शुद्ध भक्ती मागावी !
नारद म्हणाले, ‘रामा, मला तुमच्या पादपद्मी (चरणी) शुद्ध भक्ती द्या आणि मी तुमच्या ‘भुवनमोहिनी मायेने मुग्ध न व्हावे’, असे करा.’ श्रीराम म्हणाले, ‘तथास्तु, आणखी काही माग.’ नारद म्हणाले, ‘मला दुसरे काही नको. केवळ शुद्ध भक्ती हवी.’