कोल्हापूर येथे मुलाच्या वाढदिवसानिमित्त विनाअनुमती क्रिकेट स्पर्धा भरवून चिअर गर्ल्स नाचवल्या ; दोघांवर गुन्हा नोंद
विनाअनुमती क्रिकेट स्पर्धा घेणे आणि त्यात चिअर गर्ल्स आणून नाचवणे यातून समाजाची नितीमत्ता किती ढासळली आहे हेच लक्षात येते. याचप्रकारे कोरोनाचे संकट अल्प झालेले नसतांना गर्दीमुळे कोरोनाचा संसर्गही वाढू शकतो. त्यामुळे असा प्रकार करणार्यांना कठोर शिक्षा झाली, तरच पुढील वेळेस अशी अयोग्य कृती करण्यास कुणी धजावणार नाही !