नगरसेविकेच्या आक्रमकतेनंतर कर्मचार्यांकडून चूक मान्य

बदलापूर – येथे ‘अय्यंगार फ्रेश केक’ या बेकरीतील केकमध्ये उंदराची विष्ठा आढळली. नगरसेविका हर्षाली गायकवाड यांच्या संदर्भात हा प्रकार घडला. नगरसेविका गायकवाड याविषयी खडसावण्यासाठी दुकानात गेल्या, तेव्हा तेथे ठेवलेल्या खारींवर उंदीर फिरत असून केक बनवण्यासाठी वापरली जाणारी भांडी शौचालयाच्या भांड्यावर (कमोडच्या) ठेवल्याचे त्यांना दिसले. या वेळी तेथील कर्मचार्यांनी ही उंदराची विष्ठा नसून ‘चोकोचिप’ असल्याचे सांगितले; पण गायकवाड यांनी ‘हे केक पडताळणीसाठी पाठवते’, असे सांगितल्यावर कर्मचार्यांनी चूक मान्य केली. या बेकारीची अन्न आणि औषध प्रशासनाकडे तक्रार करण्याचा निर्णय नगरसेविकेने घेतला आहे. ‘नागरिकांच्या जिवाशी खेळणारी ही बेकरी बंद करावी’, अशी मागणी केली जात आहे.
पश्चिम रेल्वेत ५ वर्षांत तिकीट दलालीची २ सहस्र ८८५ प्रकरणे : अटक झालेल्यांची माहितीच उपलब्ध नाही !
अन्न आणि औषध प्रशासन विभागातील प्रश्नपत्रिका फुटीची तक्रार बोगस ! – महाराष्ट्र लोकसेवा आयोग
कल्याण-डोंबिवली येथे १ लाख ३ सहस्र ६९० रुपयांचा विनापरवाना औषधसाठा जप्त
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने देशभरात ६४ ठिकाणी ‘गुरुपौर्णिमा महोत्सवा’चे आयोजन !
आषाढी वारीत ‘आयुर्वेद व्यासपिठा’ची वारकर्यांसाठी आरोग्यसेवा !
अजिंक्यतारा आणि संगम माहुली विकासकामांना प्रशासकीय मान्यता ! – शिवेंद्रसिंहराजे भोसले, सार्वजनिक बांधकाम मंत्री