पश्चिम रेल्वेत ५ वर्षांत तिकीट दलालीची २ सहस्र ८८५ प्रकरणे : अटक झालेल्यांची माहितीच उपलब्ध नाही !

प्रतिकात्मक छायाचित्र

मुंबई – पश्चिम रेल्वेच्या सुरक्षा विभागाने वर्ष २०२१ ते २०२६ या कालावधीत रेल्वे तिकिटांच्या अवैध दलालीसंदर्भात एकूण २ सहस्र ८८५ प्रकरणे नोंदवली; मात्र या प्रकरणांमध्ये अटक केलेल्यांची माहिती उपलब्ध नसल्याचा धक्कादायक प्रकार माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी माहितीचा अधिकार कायद्यांतर्गत मागवलेल्या माहितीद्वारे उघड झाला.

अनिल गलगली म्हणाल, ‘‘तिकीट दलालीविरुद्ध सहस्रो प्रकरणे नोंदवली जाते, यावरून ही समस्या किती गंभीर आहे ?, हे यावरून स्पष्ट होते. जर पश्चिम रेल्वे विभागीय मुख्यालय स्तरावर अटक झालेल्यांची नोंदच ठेवली जात नसेल, तर देखरेख आणि उत्तरदायित्व यांवर परिणाम होतो. त्यामुळे अशा सर्व प्रकरणांची एकत्रित माहिती नियमितपणे सार्वजनिक करावी, म्हणजे तिकीट दलालीवर अधिक प्रभावीपणे नियंत्रण मिळवता येईल.’’

संपादकीय भूमिका

रेल्वे प्रशासनाचा भोंगळ कारभार !