
मुंबई – अन्न आणि औषध प्रशासन विभागातील ‘औषध निरीक्षक (गट ब)’ भरती परीक्षेच्या प्रश्नपत्रिका फुटली होती, अशी तक्रार प्रशासनाला प्राप्त झाली होती. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे सचिव विभागाचे सचिव महेंद्र हरपालकर यांनी तक्रारीमध्ये तथ्य नसून ती बोगस असल्याचे सांगितले.
१. मार्च २०२६ मध्ये १५४ पदांसाठी ६ विभागांमध्ये ही परीक्षा झाली होती. या परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटली होती आणि त्याचा एका व्यक्तीला लाभ झाला, अशी तक्रार गौरव पाटील नावाच्या व्यक्तीकडून २१ जुलै या दिवशी ई-मेलद्वारे करण्यात आली. अन्न आणि औषध विभागाकडून त्याविषयी पुरावे मागवण्यात आले होते.
२. २७ जुलै या दिवशी गौरव पाटील आणि ज्याला प्रश्नपत्रिका फुटीचा लाभ झाल्याचा आरोप करण्यात आला, त्या दोघांना आयोगाच्या कार्यालयात चौकशीसाठी बोलावले होते. दोघेही उपस्थित राहिले नाहीत; मात्र गौरव पाटील याने मित्र ऋषिकेश हंगरडे याने भ्रम पसरवण्यासाठी खोटा ई-मेल केल्याचे सांगितले.
३. ही तक्रार महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने गांभीर्याने घेतली आहे. या प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट करणार असल्याचे महेंद्र हरपालकर यांनी सांगितले.
पश्चिम रेल्वेत ५ वर्षांत तिकीट दलालीची २ सहस्र ८८५ प्रकरणे : अटक झालेल्यांची माहितीच उपलब्ध नाही !
बदलापूर येथे बेकरीतील केकमध्ये उंदराची विष्ठा !
कल्याण-डोंबिवली येथे १ लाख ३ सहस्र ६९० रुपयांचा विनापरवाना औषधसाठा जप्त
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने देशभरात ६४ ठिकाणी ‘गुरुपौर्णिमा महोत्सवा’चे आयोजन !
आषाढी वारीत ‘आयुर्वेद व्यासपिठा’ची वारकर्यांसाठी आरोग्यसेवा !
अजिंक्यतारा आणि संगम माहुली विकासकामांना प्रशासकीय मान्यता ! – शिवेंद्रसिंहराजे भोसले, सार्वजनिक बांधकाम मंत्री