पुणे – दळणवळण बंदी नंतर पुण्यासह राज्यातील अल्प झालेले सूक्ष्म धूलिकणांचे प्रमाण परत वाढले आहे. पुणे शहरातील धूलिकणांचे प्रमाण ५ पटीने वाढले आहे. गेल्या २ मासापासून परत प्रदूषण वाढल्याचा निष्कर्ष (सी.एस्.ई.) सेंटर फॉर सायन्स अँड एन्व्हायर्न्मेंट या संस्थेच्या अभ्यासातून निघाला आहे.
जुलै २०२० मध्ये १२ पर्यंत न्यून झालेले प्रमाण नोव्हेंबर २०२० मध्ये ४० मायक्रोग्रॅम प्रतिक्युबिक मीटर एवढे वाढले आहे. हे सूक्ष्मकण श्वासातून थेट फुप्फुसात जातात आणि त्यातून आरोग्याच्या गंभीर समस्या निर्माण होतात. तसेच हिवाळ्यात या समस्यांची तीव्रता वाढते.