मी कीव येथे असून कुठेही लपलेलो नाही ! – व्लोदिमिर झेलेंस्की, राष्ट्राध्यक्ष, युक्रेन

रशिया-युक्रेन युद्धाच्या काळात पोलंडला पळून गेल्याच्या अफवेनंतर युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लोदिमिर झेलेंस्की पुन्हा एकदा जगासमोर आले आहेत.

युद्धासाठी रशियाला उत्तरदायी धरले पाहिजे ! – ‘जी सेव्हन’ राष्ट्रे

वर्ष २०१४ मध्ये रशियाने युक्रेनमधील क्रिमिया प्रांतावर आक्रमण करून तो कह्यात घेतल्यानंतर या राष्ट्रांच्या गटातून रशियाला काढून टाकण्यात आले होते. त्यानंतरही रशियाने क्रिमियावरील दावा सोडला नाही.

पुतिन यांना रोखले नाही, तर युरोप नष्ट होईल ! – युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेंस्की

युक्रेन आणि रशिया यांच्यामधील युद्धाच्या १० दिवशी रशियाने युक्रेनच्या राष्ट्रपती भगवाला लक्ष्य करत क्षेपणास्त्र डागले; मात्र ते भवनाच्या काही अंतरावर पडले. यावरून युक्रेनने ‘रशियाचा निशाणा पुन्हा एकदा चुकला’, असे म्हटले आहे.

भारतीय विद्यार्थ्यांना आता मॉस्को मार्गे भारतात आणणार !

युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना भारतीय वायूदलाचे विशेष विमान आता मॉस्को मार्गे भारतात परत आणणार आहे. मॉस्को ते खारकीव हे अंतर ७५० किलोमीटर इतके आहे.

पुतिन यांना संपवणे, हे जगासाठी उत्तम काम ठरेल ! – अमेरिकेचे खासदार लिंडसे ग्रॅहम

जेव्हा पुतिन यांना संपवले जाईल. तुम्ही तुमच्या देशासाठी आणि जगासाठी उत्तम काम कराल, असे ट्वीट करत अमेरिकेचे खासदार लिंडसे ग्रॅहम यांनी पुतिन यांची हत्या करण्याची भाषा केली आहे.

रशिया-युक्रेन युद्धाविषयी भारताने स्वत:चे हित पाहून निर्णय घ्यायला हवेत ! – (निवृत्त) मेजर जनरल जगतबीर सिंह, भारतीय सेना

भारताला रशिया-युक्रेन युद्धाविषयी काळजीपूर्वक भूमिका घेतली पाहिजे आणि भारताचे हित पाहूनच पुढील पावले उचलली पाहिजेत.

युक्रेनमध्ये असलेल्या युरोपमधील सर्वांत मोठ्या अणूऊर्जा केंद्रावर रशियाचे नियंत्रण

नीपर नदीच्या किनारी असलेल्या युक्रेनच्या अणूऊर्जा केंद्रावर रशियाने आक्रमण करून ते स्वतःच्या नियंत्रणात घेतले आहे. हे केंद्र युरोपमधील सर्वांत मोठे, तर पृथ्वीवरील ९ व्या क्रमांकाचे अणूऊर्जा केंद्र आहे. या अणूऊर्जा प्रकल्पातून युक्रेनला ४० टक्के अणुऊर्जेचा पुरवठा होतो.

युक्रेनची लढाऊ वृत्ती रशियासाठी वरचढ !

रशिया-युक्रेन युद्धामध्ये युक्रेन गनिमी कावा पद्धतीने युद्ध करत आहे. रशिया अधिकाधिक धोकादायक शस्त्रांचा वापर करण्याची धमकी देत आहे. या पार्श्वभूमीवर हे युद्ध थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत.

रशियाकडून युक्रेनच्या केंद्रीय रेल्वे स्थानकावर आक्रमण

युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लोदिमिर झेलेंस्की यांच्या कार्यालयाने एक निवेदन प्रसिद्ध करून ‘लढाई अजूनही चालू आहे’, असे म्हटले आहे.

युक्रेनविरुद्धच्या युद्धात ४९८ रशियन सैनिकांचा मृत्यू

युद्धामध्ये रशियाचे ६ सहस्र सैनिक मारल्याचा आणि रशियन विमान पाडल्याचा युक्रेनचा दावा फेटाळून लावत रशियाने युक्रेनविरुद्धच्या युद्धात ४९८ रशियन सैनिकांचा मृत्यू झाल्याचे, तर १ सहस्र ५९७ सैनिक घायाळ झाल्याचे अधिकृतरित्या सांगितले.