मागासवर्ग आयोगाकडून खुल्या प्रवर्गाचे सर्वेक्षण करतांना ब्राह्मणांचेही सर्वेक्षण !

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाकडून मराठा समाज आणि खुल्या प्रवर्गातील सर्वेक्षण करण्यात येत आहे.

श्रीरामाचा अवमान करणार्‍या सोहेल याला कुडचडे येथील श्री रामभक्तांनी सर्वांसमक्ष क्षमा मागण्यास भाग पाडले !

अयोध्या येथे २२ जानेवारी या दिवशी श्रीराममंदिरामध्ये प्राणप्रतिष्ठा सोहळा झाल्याच्या पार्श्वभूमीवर हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावून धार्मिक तणाव निर्माण करण्याच्या गोव्यात ४ घटना घडल्या आहेत.

पुणे शहरात ४७ लाख रुपयांचा प्रतिबंधित साठा शासनाधीन !

अन्न आणि औषध प्रशासन विभागाने शहरात आखलेल्या धडक मोहिमेत ४७ लाख २२ सहस्र ३०० रुपयांचा प्रतिबंधित साठा आणि एक वाहन शासनाधीन केले आहे.

प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजाचा वापर करू नये !- डॉ. राजा दयानिधी, जिल्हाधिकारी, सांगली

राष्ट्रध्वजाचा उचित सन्मान राखण्यासाठी भारतीय ध्वजसंहितेच्या कलम १.२ ते १.५ मध्ये राष्ट्र्रध्वजाच्या उचित वापराविषयी प्रावधान केले आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाने दिलेल्या निर्देशानुसार राष्ट्र्रध्वजासाठी प्लास्टिकच्या वापरास मान्यता नाही.

‘श्रीरामजन्मभूमी यशोत्सव समिती कराड’च्या वतीने श्रीरामपूजन आणि प्रसादवाटप !

अयोध्या येथे होणार्‍या श्री रामलला प्राणप्रतिष्ठा कार्यक्रम सोहळ्याच्या निमित्ताने येथील ‘श्रीरामजन्मभूमी यशोत्सव समिती’च्या वतीने चावडी चौक या ठिकाणी श्रीरामाच्या प्रतिमेचे पूजन आणि आरती करण्यात आली

मुंबई आणि डोंबिवली येथील जैन मंदिरांत चोर्‍या करणार्‍या सराईत चोरट्याला अटक

मुंबईत विविध ९ पोलीस ठाण्यांमध्ये त्याच्यावर जैन मंदिरात चोरी केल्याचे गुन्हे नोंद आहेत. या प्रकरणी पुढील अन्वेषण पोलीस करत आहेत.

मौजे वडगाव (जिल्हा कोल्हापूर) येथे ९ वीतील अल्पवयीन धर्मांध विद्यार्थ्याने शाळेत टिपू सुलतानचे चित्र लावले !

वारंवार घडणार्‍या अशा घटनांतून मुसलमान मुलांसमोर इस्लामी आक्रमकांचे उदात्तीकरण केले जाऊन त्यांनी केलेल्या कृत्यांना ‘क्रांतीकारी’ नि ‘आदर्श’ ठरवले जाते, हेच लक्षात येते. तसेच अशा मुलांकरवी कोण अशा कृती करवून घेतो, याचा तपासही व्हायला हवा !

ठाणे येथील विद्यार्थी मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ घेत असल्याचे वास्तव उघड !

सर्व यंत्रणा हाताशी असणार्‍या पोलिसांनी खरेतर अशा अमली पदार्थ विक्रेत्यांवर आधीच कारवाई करणे अपेक्षित होते. आता या चर्चासत्रानंतर या तस्करांच्या विरोधात केव्हापर्यंत कारवाई करणार, हे त्यांनी स्पष्ट केले पाहिजे !

मिरज येथे धर्माभिमानी दिगंबर कोरे यांच्याकडून सनातनच्या रामलला विशेषांकाचे वितरण !

येथील धर्माभिमानी श्री. दिगंबर कोरे यांनी अयोध्येच्या ‘श्रीराममंदिराच्या लोकार्पण’ सोहळ्याच्या निमित्ताने भोसले चौक येथे श्रीरामरक्षा सामूहिक पठणाचा कार्यक्रम २२ जानेवारी या दिवशी आयोजित केला होता.

मिरज येथे शंकराचार्य विद्यानृसिंह सरस्वती यांच्या शुभहस्ते नूतन श्रीराम मंदिरात ‘कलशारोहण आणि प्राणप्रतिष्ठा’ !

अयोध्या येथील श्रीराम मंदिराच्या लोकार्पणाच्या निमित्ताने येथील विविध मंदिरांमध्ये महिलांचे हळदीकुंकू, प्रवचन, महाआरती, श्रीरामरक्षास्तोत्र पठण, श्रीरामनाम संकीर्तन, तसेच मंदिर स्वच्छता अभियान पार पडले.