सांगली येथे ‘मंगल कलश शोभायात्रा’ आणि ‘श्री तुलसीदास रामायण कथा वाचन’ यांचे आयोजन ! 

अयोध्या येथील श्रीराममंदिरात प्राणप्रतिष्ठा आणि लोकार्पण महोत्सवाच्या निमित्ताने येथील श्री बालाजी मंदिर संचालित श्री सीताराम मंदिरात माहेश्वरी समाजाच्या वतीने ‘भव्य मंगल कलश शोभायात्रा’ आणि ४ दिवसीय उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. 

जळगाव येथील श्रीराम मंदिर संस्थानच्या वतीने ‘अयोध्या सप्ताह आनंद सोहळ्या’चे आयोजन !

जळगावनगरीचे ग्रामदैवत असलेले श्रीराम मंदिर संस्थान हे कान्हादेशातील प्रमुख संस्थानांपैकी आहे. या संस्थानास वारकरी संप्रदायाची थोर परंपरा लाभलेली आहे.

पाथर्डी (जिल्हा अहिल्यानगर) तालुक्यातील २०० प्राथमिक शिक्षकांचे विमा हप्ते भरले नाहीत !

पाथर्डी तालुक्यातील २०० प्राथमिक शिक्षकांचे विम्याचे १० हप्ते शिक्षण विभागाने भरलेले नाहीत. त्यामुळे या शिक्षकांची ‘विमा पत्रे’ (विमा पॉलिसी) बंद पडली आहेत. ती पुन्हा कार्यान्वित करण्यासाठी शिक्षकांना ‘दंड’ भरण्याची वेळी आली आहे.

मिरज येथे श्रीराममंदिराची साकारली जात आहे भव्य प्रतिकृती !

२० सहस्र चौरस फूट क्षेत्र, ६३ फूट उंची, २२ शिखरे, १ कळस, १५० कमानी आणि १६७ खांब असणारी भव्य प्रतिकृती साकारण्याचे काम येथील तालुका क्रीडा संकुल मैदान येथे चालू आहे.

सांगली येथे ‘विकसित भारत संकल्प यात्रे’चे उत्साहात स्वागत !

महापालिकेचे आयुक्त सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी १९ जानेवारीपर्यंत विकसित भारत संकल्प यात्रा चालू रहाणार आहे.

अहिल्यानगर येथे सनातन संस्थेच्या वतीने बिंदूदाबन उपचार शिबिर पार पडले !

शिबिरामध्ये सनातन संस्थेचे साधक आणि निसर्गोपचारतज्ञ डॉ. दीपक जोशी यांनी शिबिरार्थींना मार्गदर्शन केले. मणक्याचे आजार, गुडघ्‍याचे आजार, पोटाचे विकार असे विविध आजार असणाच्‍या ५६ साधक रुग्‍णांवर डॉ. दीपक जोशी यांनी उपचार केले.

हिंगोली येथे तरुणाकडून आई-वडील आणि भाऊ यांची हत्या !

लोकांच्या मनावर विपरीत परिणाम घडवणारे चित्रपट किंवा मालिका प्रसारित करण्यापेक्षा त्यांच्यावर योग्य संस्कार होतील अशीच दृश्ये यांतून दाखवली गेली पाहिजेत ! चित्रपट दिग्दर्शक किंवा मालिका निर्माते यांनी हे लक्षात घ्यावे !

सिंधुदुर्ग : बगलमार्गावरील दुभाजक फोडणार्‍यांवर कारवाई न झाल्यास उपोषण करणार ! – रवींद्र केरकर, उपसरपंच, इन्सुली

हे प्रशासनाला का समजत नाही ? अशी चेतावणी का द्यावी लागते ?

सिंधुदुर्ग : मार्गावर सुरक्षारक्षक न नेमल्यास खनिज वाहतूक रोखणार ! – हेमंत मराठे, उपसरपंच, मळेवाड-कोंडुरे ग्रामपंचायत

खनिज वाहतूक करतांना सुरक्षारक्षक नेमण्याच्या जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या आदेशाची पायमल्ली केली जात आहे, तर याकडे खाण अधिकारी दुर्लक्ष करत आहेत. त्यामुळे अपघात होऊन जीवित आणि वित्त हानी होण्याची दाट शक्यता आहे.

नाशिकमध्ये पंतप्रधान येणार म्हणून केलेल्या कामांनंतर आता परिसरासह नदीपात्र पुन्हा अस्वच्छ !

पंतप्रधानांचा दौरा संपल्यावर गोदावरीत पुन्हा कपडे धुण्यासह प्लास्टिक टाकण्यास आरंभ झाला. २४ घंट्यांपूर्वीचे गोदावरीचे चांगले झालेले रूप पालटून ती पूर्ववत् बकाल होण्यास आरंभ झाला.