वारकर्‍यांनी पाणी वापरासाठी कालव्‍याच्‍या घाटांचा उपयोग करावा ! – जलसंपदा विभागाचे आवाहन

जलसंपदा विभागाने आवश्‍यक ती काळजी घेतली आहे; पण वारकर्‍यांनी आंघोळ किंवा कपडे धुण्‍यासाठी कालव्‍यात न उतरता आवश्‍यकता वाटल्‍यास घाटांचा उपयोग करावा, असे आवाहन जलसंपदा विभागाने केले आहे.

‘आदिपुरुष’ चित्रपटावर बंदी आणा !

भगवान श्रीरामावर आधारित ‘आदिपुरुष’ या चित्रपटाच्‍या विरोधात नाशिकमधील संत आणि महंत यांनी एकत्रित येऊन आंदोलन केले.

कुरिअरद्वारे तलवार मागवणार्‍या मुसलमान वडील आणि मुलगा यांना अटक !

कुरिअरद्वारे तलवार मागवणारे मुसलमान वडील आणि मुलगा यांना पोलिसांनी अटक केली. अदनान सादिक खाटीक (वय १९ वर्षे) हा पांढर्‍या गोणीतून झाकून तलवार आणत होता.

पबजीतून मैत्री झालेल्‍या तरुणीचा संगमनेरमधून (अहिल्यानगर) अपहरणाचा प्रयत्न !

अक्रमने तिला ‘ माझ्यासोबत बिहारला चल, आपण लग्न करू’  असा आग्रह धरला., मुलीने त्यास नकार दिला; मात्र अक्रम आणि नेमतुल्ला यांनी ‘तुला यावेच लागेल, नाही तर तुझ्‍या घरी येऊन तुझी अपकीर्ती करू’, अशी धमकी दिली.

पुणे येथे २ वेगवेगळ्‍या ठिकाणी गोरक्षकांच्‍या सतर्कतेमुळे गोमांस वाहतूक करणारे कह्यात !

दुसर्‍या एका प्रकरणात १७ जून या दिवशी जनवाडी गोखलेनगरमध्‍ये गोमांस विक्री चालू असल्‍याची माहिती मिळाल्‍यानंतर गोरक्षकांनी कसायाला पकडले. त्‍या वेळी त्‍याने मुसलमानांचा जमाव एकत्रित करण्‍यास चालू केले. तेव्‍हा गोरक्षकांनी जनवाडी पोलिसांचे साहाय्‍य घेऊन गोमांसाने भरलेली गोणी उघडली. त्‍यामध्‍ये गायीचे तोंड, धड, पाय आढळून आले.

वाशिम येथे कत्तलीसाठी नेणार्‍या १४ बैलांसह २५.८१ लाखांचा ऐवज जप्‍त !

वाशिम येथून कत्तलीसाठी घेऊन जाणार्‍या १४ बैलांसह २५.८१ लाख रुपयांचा माल स्‍थानिक गुन्‍हे शाखेच्‍या पथकाने १८ जून या दिवशी जप्‍त केला आहे. या प्रकरणी १४ जणांवर हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्‍यात गुन्‍हा नोंद करण्‍यात आला असून ६ जणांना कह्यात घेतले आहे.

धाराशिव येथे काम करून घेऊन कामगारांना डांबून ठेवणार्‍या ३ ठेकेदारांना पोलीस कोठडी !

धाराशिव तालुक्‍यातील वाखरवाडी आणि कळंब तालुक्‍यातील खामसवाडी येथे विहिरीवर काम करण्‍यासाठी परजिल्‍ह्यातील ११ कामगारांना बळजोरीने डांबून ठेवणार्‍या कृष्‍णा शिंदे, संतोष जाधव आणि रणजित साबळे या ३ ठेकेदारांवर ढोकी पोलिसांनी गुन्‍हा नोंद करून अटक केली होती. तिघांनाही न्‍यायालयासमोर उपस्‍थित केले असता त्‍यांना २१ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्‍यात आली आहे.

पाण्‍याच्‍या समस्‍येच्‍या विरोधात विरारमध्‍ये जलआक्रोश मोर्चा !

जिल्‍ह्यातील विरार परिसरातील नागरिकांच्‍या वतीने १८ जून या दिवशी सकाळी १० वाजता जलआक्रोश मोर्चा काढण्‍यात आला. विरार पूर्व आणि पश्‍चिम भागांत मागील अनेक दिवसांपासून पाण्‍याची समस्‍या आहे.

निविदा प्रक्रियेतील आरोपांमुळे पुणे शहरातील अद्याप ६० किलोमीटर रस्‍त्‍यांची दुरुस्‍ती अपूर्ण !

पावसाळा तोंडावर आला असतांनाही निविदा प्रक्रियेवर झालेल्‍या आरोप-प्रत्‍यारोपातून अनेक रस्‍त्‍यांची कामे प्रलंबित राहिली आहेत. शहरातील १०० किलोमीटर लांबीच्‍या रस्‍त्‍यांपैकी केवळ ४० किलोमीटर रस्‍त्‍यांची दुरुस्‍ती झाली आहे.

सोलापूर येथील गोरक्षकांनी वाचवले ७ गोवंशियांचे प्राण !

विश्व हिंदु परिषद, बजरंग दल यांच्या गोरक्षकांनी १६ जून या दिवशी ७ गोवंशियांचे प्राण वाचवले. गोरक्षकांनी भाग्यनगर रस्ता येथे थांबून पोलिसांच्या साहाय्याने गोवंशीय असलेले वाहन पकडले.