बंदुकीद्वारे दहशत निर्माण करणार्‍या धर्मांधांना अटक !

कोंडवे येथे काही दिवसांपूर्वी ३ संशयितांकडून बंदुकीद्वारे दहशत निर्माण करण्‍यात आली होती. या प्रकरणी महिताब जब्‍बार शेख, अश्‍फाक मुबारक शेख आणि मनीष चांद कुरेशी यांना पोलिसांनी अटक केली आहे. अटक केलेल्‍या युवकांनी कोंडवे येथील तक्रारदारांच्‍या घरासमोर बंदूक रोखून दहशत निर्माण केली होती.

हिंदु जनजागृती समितीच्‍या वतीने सातारा येथे गणेशोत्‍सव मंडळांची बैठक पार पडली

या बैठकीमध्‍ये सातारा शहर आणि पंचक्रोशीतील गणेशोत्‍सव मंडळांचे पदाधिकारी अन् कार्यकर्ते सहभागी झाली होते. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे श्री. हेमंत सोनवणे, सौ. रूपा महाडिक आणि सौ. भक्‍ती डाफळे उपस्‍थित होत्‍या.

चांदवड (जिल्हा नाशिक) येथे जनआक्रोश मोर्चात सहस्रो हिंदूंचा सहभाग !

‘लव्ह जिहाद’ आणि ‘धर्मांतरबंदी कायदा’ लागू करावा, या मागणीसाठी विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या पुढाकाराने ‘जनआक्रोश मोर्चा’ काढण्यात आला.

सोलापूर येथे प्रतिदिन ५ लाख लिटर दूध संकलन असलेल्या केंद्रांची प्रशासनाकडे नोंदणी नाही !

जिल्ह्यात प्रतिदिन १२ लाख ७९२ लिटर दूध संकलन होते. त्यातील ५ लाख ५०० लिटर दुधाचे संकलन होत असलेल्या प्रकल्पाची जिल्हा प्रशासनाकडे नोंदच नाही. त्यामुळे भेसळ रोखण्यासाठी शासकीय यंत्रणा कुचकामी ठरत आहेत. यावर उपाय म्हणून अपर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेत एका पथकाची स्थापना करण्यात आली आहे.

७ सप्टेंबरला ‘युवाशक्ती दहीहंडी’चे आयोजन ! – धनंजय महाडिक, खासदार, भाजप

कोल्हापुरातील ऐतिहासिक दसरा चौकात धनंजय महाडिक युवाशक्ती आणि भाजप यांच्या संयुक्त विद्यमाने ७ सप्टेंबरला दुपारी ४ वाजता ‘युवाशक्ती दहीहंडी’चे आयोजन करण्यात आले आहे.

कागल (जिल्हा कोल्हापूर) तालुक्यात दुष्काळ घोषित करा ! – ग्रामस्थांचे निवेदन

पावसाने ओढ दिल्याने खरीप पिके, तर जनावरांच्या लंपी आजारामुळे दुग्ध व्यवसाय धोक्यात आला आहे. शासनाने शेतकर्‍यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे रहावे, यांसाठी हेक्टरी १५ सहस्र रुपयांचे सहकार्य घोषित करावे

महाड (रायगड) येथील गोप्रेमी आणि हिंदुत्वनिष्ठ यांची पोलीस अधीक्षक कार्यालयास भेट !

जिल्ह्यात होणारी गोतस्करी आणि गोहत्या आटोक्यात आणण्यासाठी, त्यातून निर्माण होणारा कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न, कसाई अन् गोतस्कर यांच्याकडून हिंदु गोरक्षक आणि कायदेशीर कारवाई करायला येणारे पोलीस प्रशासन यांच्यावर होणारी आक्रमणे, जीविताला निर्माण होणारा संभाव्य धोका, वाढती धार्मिक तेढ, वाढता जातीवाद आणि राजेवाडी (महाड) येथील हिंदू आणि पोलीस यांच्यावर करण्यात आलेले भ्याड आक्रमण या सर्वांच्या निषेधार्थ अन् या विषयांवर चर्चा करण्यासाठी गोप्रेमी आणि हिंदुत्वनिष्ठ यांनी येथील पोलीस अधीक्षक कार्यालयास भेट दिली.

स्वच्छतागृहाच्या बाहेर असलेले औदुंबराचे झाड स्थलांतरित करण्याची भाविकांनी मागणी !

श्री महालक्ष्मीदेवी मंदिर परिसरात नुकतेच नवीन स्वच्छतागृह बांधण्यात आले आहे. या स्वच्छतागृहाच्या बाहेर औदुंबराचे झाड असून त्याच्या बाहेर संरक्षक भिंत आहे. ‘औदुंबरामध्ये श्री दत्ततत्त्व असते. त्यामुळे भाविकांकडून हे झाड स्थलांतरित करण्यात यावे’, अशी मागणी करण्यात येत आहे.

नाशिकचे प्रसिद्ध व्यावसायिक हेमंत पारख यांचे अपहरण !

इंदिरानगर येथे २ सप्टेंबरच्या रात्री ९.४५ वाजता येथील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक हेमंत पारख यांचे गुंडांनी त्यांच्या घरासमोरून अपहरण केले आहे. हे गुंड चारचाकीतून आणि दुचाकीवरून आले होते. त्यांनी हेमंत पारख यांना चारचाकीत ढकलले आणि सुसाट वेगाने पळून गेले. अपहरणामागील कारण समजलेले नाही. 

पाकिस्तानच्या स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा देणार्‍या युवतीवर गुन्हा नोंद !

सामाजिक माध्यमाद्वारे पाकिस्तानच्या स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा देण्यासह हिंदु देवतेची अपकीर्ती केल्याच्या प्रकरणी पोलिसांनी तालुक्यातील अल्पसंख्य समाजातील एका युवतीवर गुन्हा नोंद केला आहे.