साधनेच्या संदर्भात नुसते प्रश्न विचारू नका, कृती करा !

‘साधनेसंदर्भात काही जण नुसते प्रश्न विचारत असतात, कृती काहीच करत नाहीत. त्यांनी लॉर्ड अल्फ्रेड टेनिसन यांचे पुढील सुवचन लक्षात ठेवून साधना करावी. ‘का आणि कसे ?’ अशा प्रकारचे प्रश्न विचारत बसू नका, तर कार्यात स्वतःला झोकून द्या आणि वेळप्रसंगी सर्वस्वही अर्पण करा !’ – लॉर्ड अल्फ्रेड टेनिसन (Ours is not to reason why, ours is but to do and die. – Lord Alfred Tennyson)’

हिंदूंनो, ‘अहोरात्र संघटित रहाणे, ही काळाची आवश्यकता आहे’, हे जाणा !

‘भारत स्वतंत्र झाल्यानंतर ७० वर्षांत काँग्रेसने निवळ हिंदुद्वेष आणि अल्पसंख्यांकांचे तुष्टीकरण केले. भारताला आणि हिंदु धर्माला नष्ट करण्यासाठी साम, दाम, दंड अन् भेद अशा सर्व नीतींचा वापर केला. काळानुरूप हिंदूंनी एकजुटीने काँग्रेसचे अस्तित्व संपुष्टात आणले. यावरून हिंदूंनो, आपल्या एकीचे बळ जाणा ! केवळ सत्तापालटापुरते नाही, तर ‘अहोरात्र संघटित रहाणे, ही काळाची आवश्यकता आहे’, याचाही बोध घ्या !’

बुद्धीप्रामाण्यवाद्यांचा व्यर्थ अहंकार !

‘बुद्धीप्रामाण्यवाद्यांना ‘मानवाने निरनिराळी यंत्रे शोधली’, याचा अहंकार असतो. त्यांच्या हे लक्षात येत नाही की, ईश्वराने जीवाणू, पशू, पक्षी, ७० – ८० वर्षे चालणारे एक यंत्र, म्हणजे मानवी शरीर यांच्यासारख्या अब्जावधी गोष्टी बनवल्या आहेत. त्यांतील एकतरी गोष्ट शास्त्रज्ञांना बनवता आली आहे का ?’

सात्त्विक व्यक्तींच्या जीवनाचे अंतिम ध्येय !

‘सात्त्विक व्यक्तींच्या व्यष्टी जीवनाचे ध्येय असते ईश्वरप्राप्ती, तर समष्टी जीवनाचे ध्येय असते रामराज्य !’

‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’चे हे असणार अद्वितीय वैशिष्ट्य !

‘जगातील सर्वच महाविद्यालयांत आणि विश्वविद्यालयांत मायेतील विषयांचे शिक्षण दिले जाते. याउलट ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयात’ १४ विद्या आणि ६४ कला यांच्या माध्यमांतून ‘मायेतून मुक्ती कशी मिळवायची’, याचे शिक्षण देण्यात येणार आहे.’

आपत्काळात वाचण्यासाठी तरी साधना करा !

‘न मे भक्तः प्रणश्यति ।’ – श्रीमद्भगवद्गीता, अध्याय ९, श्लोक ३१ अर्थ : माझा भक्त नाश पावत नाही. भक्ताला, साधना करणार्‍यालाच देव वाचवतो. हे लक्षात घेऊन आतापासून तीव्र साधना करा, तरच देव आपत्काळात वाचवील.’

कुठे राष्ट्रांचे प्रमुख, तर कुठे ऋषिमुनी !

‘स्वातंत्र्यापासून आतापर्यंतच्या किती राष्ट्रपतींची आणि पंतप्रधानांची नावे किती जणांना ज्ञात आहेत ? याउलट ऋषीमुनींची नावे सहस्रो वर्षे ज्ञात आहेत !’

‘हिंदु राष्ट्राच्या स्थापने’संदर्भात योग्य दृष्टीकोन !

‘हिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या कार्यात मी साहाय्य करीन’, असा दृष्टीकोन नको, तर ‘हे माझेच कार्य आहे’, असा दृष्टीकोन हवा ! तसा दृष्टीकोन असल्यास कार्य चांगले होते आणि स्वतःचीही (आध्यात्मिक) प्रगती होते.’

‘सनातन प्रभात’ नियतकालिकांचे वेगळेपण !

‘सनातन प्रभात’मधील ३० टक्के लिखाण साधनेसंदर्भातील असल्यामुळे वाचकांना अध्यात्माची ओळख होते आणि काही जण साधना करण्यास आरंभ करून जीवनाचे सार्थक करतात. याउलट बहुतेक सर्वच नियतकालिकांत १ टक्का लिखाणही साधनेसंदर्भात नसल्याने वाचकांना त्यांचा खर्‍या अर्थाने लाभ होत नाही.’

या कारणामुळे तरुण पिढ्यांवर हाेत आहेत तामसिक संस्कार !

‘सात्त्विक चित्रकार देवतेची सात्त्विक चित्रे काढतात. याउलट एम्.एफ्. हुसेनसारखे तामसिक चित्रकार देवतेची नग्न, तामसिक चित्रे काढतात. यात आश्चर्य एवढेच की, मृतवत हिंदूंनी त्यासंदर्भात वर्षानुवर्षे काही केले नाही. त्यामुळे पुढच्या पिढ्यांवरती तसे संस्कार झाले !’