स्वतःच्या आत्मरूपाचा शोध घेऊन आनंदघन होणे महत्त्वाचे !

स्वतःच्या आत्मरूपाचा शोध घेऊन आनंदघन होणे महत्त्वाचे !

या सुकणार्‍या, नश्‍वर देहाचा अभिमान किती दिवस ठेवायचा? यामध्ये काय आहे ? आनंदघनाचे स्वरूप विसरण्यास याचा अभिमान कारण बनून अपरिमित दुःखास कारणीभूत होत असेल, तर याचा अभिमान सोडण्यास कोणता मुहूर्त पहावयास हवा ?

ईश्‍वरी राज्याचे कल्पनातीत महत्त्व !

‘अनेक गुन्हे करून आत्महत्या करणार्‍याला सरकार कशी शिक्षा करणार ? ईश्‍वर मात्र करतो. यावरून ईश्‍वराचे राज्य किती कल्पनातीत आहे, हे लक्षात येते. त्यामुळे ईश्‍वरी राज्याच्या स्थापनेसाठी प्रयत्नरत रहा !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले  

दुष्टांना क्षमा करणे, हा क्षमेचा अतिरेक आणि दुरुपयोगच !

दुष्टांना क्षमा करणे, हा क्षमेचा अतिरेक आणि दुरुपयोगच !

‘दुष्टांना क्षमा करणे, हा क्षमेचा अतिरेक आणि दुरुपयोगच होय.’ भारतातील सोमनाथ आदि मंदिराचे भग्न अवशेष हे सौजन्य, शांती आणि क्षमा यांच्या अतिरेकाचे दुष्परिणाम व्यक्त करतात. अतिरेकाचे आणि दुष्टांविषयी शांती दाखवल्याने त्यांचा स्वभाव, तर पालटणार नाहीच; पण त्यामुळे आत्मनाश होण्याची शक्यताच अधिक !

‘साधना’ हाच मानवाचा खरा अलंकार !

‘साधना’ हाच मानवाचा खरा अलंकार !

जिवाने ईश्‍वरनिर्मित धर्माचे आचरण आणि तंतोतंत पालन करणे, म्हणजेच जिवाने त्याच्या आध्यात्मिक प्रगतीसाठी उपयुक्त अशी साधना करून मिळालेल्या अमूल्य अशा मनुष्यजन्माचे सार्थक करणे.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘सर्वधर्मसमभाव’ म्हणणारे ‘काळा आणि पांढरा रंग सारखेच दिसतात’, असे म्हणणार्‍या आंधळ्यासारखे असतात !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

जिवामध्ये भाव असल्यास अलंकारांची आवश्यकता नसणे

जिवामध्ये भाव असल्यास अलंकारांची आवश्यकता नसणे

एखाद्या जिवात भाव असेल, तर देवतेचे चैतन्य ग्रहण करण्यासाठी त्याला अलंकारांची आवश्यकता भासत नाही. अन्यथा भावविरहित अवस्थेत जिवाला अलंकार धारण केल्याने लाभ मिळतोच.

‘आदर्श समाज’ दाखवा !

‘आदर्श समाज’ दाखवा !

‘अधोगतीला गेलेल्या समाजाचे प्रतिबिंब कथा, नाटके, कादंबर्‍या, चित्रपट, दूरदर्शनवरील मालिका इत्यादींत न दाखवता त्यांत समाजाला दिशा देणारा आदर्श समाज दाखवणे सर्वांकडून अपेक्षित आहे.’- (परात्पर गुरु) डॉ. आठवले 

दुसर्‍यांना विचारून करण्याचे महत्त्व

दुसर्‍यांना विचारून करण्याचे महत्त्व

आपल्या वागण्याचे कोणते परिणाम होतील, यावर दूरदृष्टी ठेवून आपण आपले प्रत्येक कार्य केले पाहिजे. त्यासाठी एखादी गोष्ट स्वतःला समजली नाही, तर ती आपण दुसर्‍यांना विचारून समजून घेऊन करावी.

हिंदूंची विनाशाकडे वाटचाल !

‘कुठे अर्थ आणि काम यांवर आधारित पाश्‍चात्त्य संस्कृती, तर कुठे धर्म आणि मोक्ष यांवर आधारित हिंदु संस्कृती ! हिंदू हे पाश्‍चात्त्यांचे अंधानुकरण करत असल्यामुळे त्यांचीही झपाट्याने विनाशाकडे वाटचाल होत आहे !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले 

भागवतो नमः !

भागवतो नमः !

‘सर्व भूतांच्या ठिकाणी जो आपलेच भगवद्स्वरूप बघतो आणि भगवद्स्वरूप असणार्‍या आपल्या ठिकाणी जो सर्व भूतांचे दर्शन घेतो अन् ज्याला आपल्या ठिकाणी सर्व भूतांचा अंतर्भाव झालेला दिसतो, तोच भागवतो नमः।’