विज्ञानाचा अहंकार असलेल्यांनो, अध्यात्माच्या तुलनेत विज्ञान किती तुच्छ आहे, हे समजून घ्या !

‘पदार्थ विज्ञान, रसायनशास्त्र, गणित, इतिहास, भूगोल इत्यादी सर्व विषय केवळ त्या त्या विषयातील माहिती सांगू शकतात. याउलट अध्यात्म हा विषय जगातील सर्व विषयांची माहिती सांगू शकतो.’ – (परात्पर   गुरु) डॉ. आठवले    

जगातील सर्व भाषांमध्ये केवळ संस्कृत भाषेतील उच्चार सर्वत्र सारखे असणे

‘लिहितांना अक्षराचे रूप महत्त्वाचे असते, तसा त्याचा उच्चार करतांना तो महत्त्वाचा असतो. जगातील सर्व भाषांमध्ये केवळ संस्कृत भाषेत याला महत्त्व दिले आहे. त्यामुळे भारतात सर्वत्र वेदोच्चार सारखेच आणि परिणामकारक आहेत. – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

अहं न बाळगता हिंदु राष्ट्राच्या कार्यात सहभागी व्हा !

‘हिंदु राष्ट्राच्या स्थापनेचे कार्य करतांना ‘मी करतो’, असा अहं बाळगण्याची आवश्यकता नाही; कारण कालमाहात्म्यानुसार ते कार्य होणारच आहे; पण या कार्यात जे निःस्वार्थीपणे तन-मन-धनाचा त्याग करून सहभागी होतील, त्यांची साधना होऊन ते जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त होतील.’

श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ यांची अमृतवचने !

‘मन शुद्ध असेल, तरच त्याचे मंदिर होते. जिथे शुद्धता असते, तिथे सात्त्विकता येते. सात्त्विक ठिकाणीच भगवंताचा वास असतो. ‘स्वभावदोष आणि अहं’ यांच्या निर्मूलन-प्रक्रियेने मन शुद्ध अन् पवित्र झाल्याने देहात ‘मनमंदिर’ निर्माण होते.

…तरच हिंदूंमध्ये अभिमान जागृत होईल !

‘भारत ९०० वर्षे पारतंत्र्यात असल्याने हिंदूंच्या कित्येक पिढ्या गुलामगिरीत जगल्या. आता मनातील गुलामगिरीचे विष नष्ट करण्यासाठी हिंदु राष्ट्राची (ईश्‍वरी राज्याची) स्थापना करण्यासाठी रात्रंदिवस प्रयत्न करणे आवश्यक आहे. तसे केल्यावरच ४ – ५ पिढ्यांत राष्ट्र आणि धर्म यांच्याविषयी हिंदूंमध्ये अभिमान जागृत होईल.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले      

हिंदु राष्ट्रात भारताचा गौरवशाली इतिहास शिकवला जाईल !

इतर देशांचा इतिहास अधिकाधिक २ – ३ सहस्र वर्षांचा आहे, तर भारताचा लाखो वर्षांचा, युगायुगांचा आहे. हे शाळेत शिकवत नाहीत….

हास्यास्पद साम्यवाद !

‘आई-वडिलांचेही आपल्या सर्व मुलांवर सारखे प्रेम नसते. असे असतांना ‘साम्यवाद’ शब्दाला काही अर्थ आहे का ?’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले 

मानवाचा संसाराशी तात्कालिक संबंध

ज्याप्रमाणे महासागरात वहात जाणारी दोन लाकडे कधी एकमेकांना भेटतात आणि काही काळाने विलग होतात, त्याप्रमाणे दोन माणसे काही काळासाठी एकत्र येतात आणि कालचक्राच्या गतीने विलग होतात.

आहाराचा मनावर होणारा परिणाम !

आहार पवित्र अथवा अपवित्र असल्यामुळे तो खाल्ल्यामुळे आपले मनही पवित्र अथवा अपवित्र बनते. भोजन करतांना उद्भवणारे मानसिक संस्कार आणि विचारांचे प्रकार यांचा खाल्लेल्या अन्नावर परिणाम होऊन मनाची विशिष्ट स्थिती होते.