परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

डॉक्टर नसलेल्याने रुग्णांवर उपाय करणे, याप्रमाणे राष्ट्र आणि धर्म यांच्याबद्दल प्रेम नसणार्‍या जनतेला राष्ट्र आणि धर्म यांच्याबद्दल प्रेम नसणार्‍या राजकीय पक्षांना निवडून द्यायचा अधिकार दिल्याने देशाची सर्वच क्षेत्रांत केविलवाणी स्थिती झाली आहे !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘तिसर्‍या महायुद्धात जिवंत रहाण्यासाठी जे लायक असतील, त्यांना देव जिवंत ठेवील, इतरांना नाही; म्हणून ‘कोण जिवंत राहील आणि कोण नाही ?’, याचा विचार करू नये.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले 

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘भारताच्या दुरवस्थेला स्वातंत्र्यापासून आतापर्यंत काहीच न करणारे उत्तरदायी आहेत. त्यांना ईश्वर योग्य ती शिक्षा करणारच आहे !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले   

वेदना, आजारपण आणि व्यावहारिक अडचणी यांचा लाभ

वेदना, आजारपण आणि व्यावहारिक अडचणी यांचा लाभ‘एरव्ही कधीही देवाची आठवण न येणार्‍यांना अशा वेळी देवाची आठवण होते.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

‘चारित्र्यसंपन्न राष्ट्र’ हेच आदर्श राष्ट्र !

सध्याचे शासनकर्ते हे लक्षात घेऊन ‘चारित्र्यसंपन्न राष्ट्र’ निर्माण करण्यासाठी प्रयत्न करतील का ? भावी हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चारित्र्यसंपन्नच असेल.’

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘कुठे एका गायीच्या रक्षणासाठी प्राणांचाही त्याग करणारे हिंदूंचे पूर्वज, तर कुठे लाखो गायींना कत्तलखान्यात पाठवणारे आजचे हिंदू !’

कलियुगात समष्टी साधना करण्याचे महत्त्व !

‘कलियुगापूर्वीच्या युगांतील राजे जनतेचे रक्षण करायचे; म्हणून प्रजा व्यष्टी साधना करायची. आताचे, विशेषतः स्वातंत्र्यानंतरचे शासनकर्ते जनतेचे रक्षण करत नसल्याने सर्वांनी समष्टी साधना करणे आवश्यक आहे.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘राजकारणी त्यांच्या मतदारसंघात किंवा इतरत्र जातात. त्या वेळी ‘त्यांचे नाव सर्वत्र व्हावे’, हा त्यांचा उद्देश असतो. या उलट संत अध्यात्माविषयीचे जिज्ञासू आणि साधक यांना साधनेच्या संदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी सर्वत्र जातात.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले  

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘मी ‘या’ पंथाचा आहे, तो ‘त्या’ पंथाचा आहे’, असे म्हणून थांबू नका, तर ‘सर्व पंथ देवाचेच आहेत’, हे लक्षात घेऊन व्यापक व्हा, म्हणजे देवाच्या जवळ जाल.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले 

हिंदूंनो, ‘हिंदु राष्ट्र हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच !’, असा निश्‍चय प्रत्येक हिंदूने करणे आवश्यक !

‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच !’, असे लोकमान्य टिळक म्हणाले होते आणि त्यासाठी त्यांनी आयुष्यभर कृती केल्या.