भगवंताचे महत्व !

‘देव भूमी, पाणी, हवा इत्यादी सर्व फुकट देतो, तरी मानवामुळे मानवाला प्रत्येक गोष्ट विकत घ्यावी लागते !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

व्यवहार आणि साधना यांतील भेद !

‘व्यवहारात अधिकाधिक कमावणे असते, तर साधनेत सर्वस्वाचा त्याग असतो; म्हणून व्यवहारातील माणसे दुःखी असतात, तर साधक आनंदी असतात.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले 

बुद्धीवादी मनुष्याला बुद्धीने देव समजण्यासाठी विज्ञानाची निर्मिती होणे

‘काळानुरूप मनुष्याचा आध्यात्मिक स्तर न्यून होऊ लागल्यावर मनुष्याला ईश्वराच्या अनुसंधानात राहून भावाच्या स्थितीत जाणे, देवाला अनुभवणे अशक्य होऊ लागले.

श्रद्धाहीन अन् बुद्धीवादी समाजाला विज्ञानाच्या आधारेच अध्यात्म पटवून द्यावे लागते !

‘पूर्वीच्या काळी ‘शब्दप्रमाण’ (सांगितलेले पूर्णतः स्वीकारणे) असल्यामुळे सर्वांची ऋषि-मुनी आणि गुरु यांनी सांगितलेल्या ज्ञानावर श्रद्धा असायची.

अध्यात्मिक साधनेचे महत्व !

‘मायेतील शिक्षण तन-मन-धनाचा वापर करून पैसे मिळवायला शिकवते, तर साधना तन-मन-धनाचा त्याग करून ईश्वरप्राप्ती करायला शिकवते !’

राजकीय पक्ष आणि सनातन संस्था यांमधील भेद

सनातन संस्थेमध्ये कार्यकर्ते नसून साधक असल्यामुळे ते प्रत्येक कार्य ‘सेवा’ म्हणून करतात. त्यामुळे ते स्वतःहून पुढाकार घेऊन कार्य करतात. त्यामुळे सनातनला साधकांच्या संदर्भात वरील प्रमाणे शंका कधीच येत नाही.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘इतर नियतकालिकांत मुलांची वाढदिवसाची छायाचित्रे विज्ञापनाचे पैसे देऊन छापण्यात येतात, तर ‘सनातन प्रभात’मध्ये गुणवंत मुलांच्या छायाचित्रांसह त्यांची आध्यात्मिक गुणवैशिष्ट्येही छापण्यात येतात.’

स्वभावदोष प्रयत्नपूर्वक घालवायला हवेत !

एकीकडे सत्संगाला जायचे आणि दुसरीकडे राग, द्वेष, लोभ, ममता इत्यादींना कवटाळून बसायचे ! अशाने आयुष्यभर सत्संगात जात राहिले, तरी काय होणार ?

ईश्वरप्राप्तीसाठी तन-मन-धनाचा त्याग करायचा असतो

‘ईश्वरप्राप्तीसाठी तन-मन-धनाचा त्याग करायचा असतो. त्यामुळे आयुष्य धन मिळवण्यात फुकट घालवण्यापेक्षा सेवा करून धनाबरोबर तन आणि मन यांचाही त्याग केला, तर ईश्वरप्राप्ती लवकर होते.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले