निवडणुका लढवणार्यांनो, हे लक्षात घ्या !
‘अनंत कोटी ब्रह्मांडांवर राज्य करायला ईश्वराला निवडणूक लढवावी लागत नाही !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
‘अनंत कोटी ब्रह्मांडांवर राज्य करायला ईश्वराला निवडणूक लढवावी लागत नाही !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
‘व्यष्टी साधनेत एकाच देवतेची उपासना असते; पण समष्टी साधनेत अनेक देवतांची उपासना असते. लष्करात पायदळ, रणगाडे, हवाईदल, नाविकदल इत्यादी अनेक विभाग असतात. त्याप्रमाणे हिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या समष्टी कार्यात अनेक देवतांची उपासना, यज्ञ-याग इत्यादी करावे लागते.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
‘नेहमीचे बोलतांना आणि भाषणात शिव्या देणार्यांच्या बोलण्याची, भाषणाची परिणामकारकता तमोगुण वाढल्याने अल्प होते आणि त्यांना पापही लागते. हे बोलतांना नेहमी लक्षात ठेवा !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
‘जनतेला पैसे देऊन किंवा खोटी आश्वासने देऊन निवडून येण्यापेक्षा ईश्वराला प्रसन्न करून त्याच्या आशीर्वादाने निवडून आल्यास जनतेलाच नव्हे, तर प्राणीमात्रांनाही खर्या अर्थाने सुखी करता येईल.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
‘राजकारणी, बुद्धीप्रामाण्यवादी किंवा वैज्ञानिक यांच्यामुळे विदेशी भारतात येत नाहीत, तर संतांमुळे, तसेच अध्यात्म आणि साधना शिकण्यासाठी येतात. तरीही हिंदूंना संत अन् अध्यात्म यांचे मूल्य कळलेले नाही.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
बुद्धीप्रामाण्यवादी त्यांना मान्य नसणारे ‘सर्व खोटे आहे’, असे म्हणतात. ‘साधनेने सूक्ष्म दृष्टी प्राप्त झाल्यावर बरेच कळते’, हे त्यांना मान्य नसते.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
‘अध्यात्म सोडून एक तरी विषय ‘सात्त्विक, सज्जन, धर्मप्रेमी आणि राष्ट्रप्रेमी कसे व्हायचे’, हे शिकवतो का ? तसे नसतांना अध्यात्म सोडून अन्य सर्व विषय शिकवणार्या स्वातंत्र्यापासूनच्या ७५ वर्षांतील भारतातील आतापर्यंतच्या शासनकर्त्यांनी देशाचे वाटोळे केले आहे.’- सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
‘सर्वधर्मसमभाव’ म्हणणारे आंधळे, बहिरे आणि मंदबुद्धीचे आहेत अन् त्यांच्यात सत्य जाणून घ्यायची इच्छाही नाही.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
‘धर्मद्रोही हे देशद्रोही आहेत; कारण धर्मामुळेच देशात सामर्थ्य येते. याचे उदाहरण म्हणजे जगातील सर्व देशांना काळजी करायला लावणारे इस्लामी देश. याउलट धर्मद्रोह्यांमुळे देश बलहीन होतो, उदा. भारत !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
मानवाचे चिरंतन कल्याण करणारे अध्यात्मशास्त्र आणि साधना. ती हिंदु धर्माची जगाला देणगी आहे. असे असूनही भारतातील आतापर्यंतच्या एकाही राजकारण्याला त्याचे महत्त्व कळले नाही. त्यामुळे त्यांनी स्वतःची, भारताची आणि हिंदु धर्माची पराकोटीची हानी केली आहे.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले