पुणे जिल्ह्यात ऑक्सिजनअभावी नवीन रुग्णांना रुग्णालयात प्रवेश बंद !

सध्या निर्माण झालेल्या ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे छोट्या रुग्णालयांना आवश्यकतेच्या जेमतेम ५० प्रतिशत ऑक्सिजनचा पुरवठा होत आहे. यामुळे नवीन रुग्ण दाखल करून घेणे रुग्णालयांना अवघड झाले आहे.

आदेशाचे उल्लंंघन करून चालू असलेल्या व्ही.एल्.सी.सी. वेलनेस अँड ब्युटी सेंटर वर पोलिसांची कारवाई !

डेक्कन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भांडारकर रस्त्यावरील व्ही.एल्.सी.सी. अँड ब्युटी सेंटर हे सलून चालू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यावर धाड टाकल्यावर ग्राहकांची अपॉइंटमेंट (वेळ घेऊन) तेथे सेवा चालू असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.

पुण्यात सराईत गुन्हेगार आणि निवृत्त पोलीस कर्मचार्‍यामधील झटापटीत गुन्हेगाराचा मृत्यू !

अनंत ओव्हाळ हे बोपोडीतील आनंदनगर परिसरात काही कामानिमित्त गेले होते. या वेळी गुन्हेगार मनिष भोसलेने त्यांची दुचाकी अडवत त्यांच्यासोबत वाद घातला. यानंतर दोघांनीही एकमेकांना मारहाण केली. या झटापटीत मनिषचा मृत्यू झाला.

पुणे शहरातील लष्करी रुग्णालयातील बेड कोरोनाबाधितांसाठी उपलब्ध करून देणार ! – प्रकाश जावडेकर, केंद्रीय मंत्री

तसेच ३ ते ४ दिवसांत महाराष्ट्राला १ सहस्र १०० ‘व्हेंटिलेटर’ मिळतील, लसीची जितकी आवश्यकता आहे, तितका साठा केंद्राकडून देण्याचा निर्णय झालेला आहे.

पुण्यात मंत्र्यांच्या उपस्थितीतच सदिच्छा भेटीच्या नावाखाली उद्घाटन सोहळा !

आपत्काळातही लोकप्रतिनिधींनी नियम न पाळणे हे गंभीर आहे. असे लोकप्रतिनिधी एरव्ही कसे वागत असतील, असा विचार कुणाच्या मनात आल्यास चूक ते काय ?

पाकला विनामूल्य लस पुरवण्याऐवजी आधी भारतियांना कोविडची लस द्या !

भारतीय सैनिकांचे बळी घेणार्‍या पाकिस्तानला विनामूल्य लस पुरवण्याऐवजी सरसकट सर्व वयोगटांतील देशातील जनतेला विनामूल्य कोविडची लस उपलब्ध करून द्यावी’, अशी मागणी युवक काँग्रेसच्या वतीने करण्यात आली आहे

खासगी आस्थापनातील ४५ वर्षांपुढील कर्मचारी आणि अधिकारी यांना मिळणार कामाच्या ठिकाणी लस !

आस्थापनांमध्ये लसीकरण झाल्यास महापालिका किंवा स्थानिक प्रशासनावरील ताण अल्प होईल. यासाठी आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देण्याची सिद्धता आस्थापनांनी यापूर्वीच दर्शवली आहे.

पुणे येथील दळणवळण बंदीच्या निर्णयाला व्यापारी संघटनांचा विरोध, मुख्यमंत्र्यांना पाठवले पत्र

राज्य सरकार पाठोपाठ पुणे महापालिकेने शहरात घोषित केलेल्या दळणवळण बंदीच्या निर्णयाचा येथील व्यापारी संघटनांनी तीव्र विरोध केला आहे.

कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या वाढत असल्याने रुग्णालयातील खाटा अपुर्‍या !

राज्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. पुणे महानगरातही रुग्णसंख्या वाढत असल्याने रुग्णालयातील खाटा अपुर्‍या पडत आहेत.

पुण्यातील कुख्यात गुंड गजा मारणे आणि नीलेश घायवळ या दोघांवर एम्.पी.डी.ए. अंतर्गत कारवाई !

सामान्य जनतेस गुन्हेगारी टोळ्यांपासून त्रास असल्यास त्यांनी निर्भीडपणे पोलीस ठाण्यात तक्रार करावी, असे आवाहन पुणे ग्रामीण पोलिसांनी केले आहे.