इंदापूर (पुणे) येथे अवैध ऑक्सिजन साठा जप्त, भरलेले ५१ सिलिंडर ताब्यात !

इंदापूर तालुक्यातील लोणी देवकर येथील एम्.आय.डी.सी.मधील वाय अ‍ॅक्सिस स्ट्रक्चरल स्टील प्रा. लि. या आस्थापनात इंदापूर पोलिसांनी धाड टाकत ७ लाख ५५ सहस्र ७०० रुपयांचा अवैध ऑक्सिजन साठा जप्त केला.

पुणे येथील नाना पेठेमधील शितळादेवीच्या मंदिरात चोरी !

पुणे शहरातील नाना पेठेतील समर्थ कॉम्पेक्स मधील शितळादेवी मंदिरात २४ एप्रिलच्या मध्यरात्री चोरीची घटना घडली. चोरांनी देवीच्या गाभार्‍यात प्रवेश करत देवीचा चांदीचा मुकुट आणि दानपेटीतील पैसे अन् सीसीटीव्हीचा व्हीडीआर् असा ऐवज चोरून नेला.

आता पुण्यात कोरोना रुग्णांचे होणार ‘ऑडिट’ !

कोरोना रुग्णांची संख्या प्रतिदिन वाढत आहे. या स्थितीत अनेक रुग्णांना वेळेत बेड न मिळणे, उपचार न होणे यांमुळे मृत्यू होत आहेत. त्यामुळे आता रुग्णांचे ‘ऑडिट’ करण्याचा एक नवा प्रयोग महापालिकेने घेतला असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त रूबल अग्रवाल यांनी दिली.

दहावीच्या विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क परत करा !- अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि कॉप्स विद्यार्थी संघटनेची मागणी !

दहावीच्या परीक्षा रहित झाल्याने पर्यवेक्षकांना देण्यात येणारे मानधन, भरारी पथकांचा व्यय आदी व्यय होणार नसल्याने दहावीच्या विद्यार्थ्यांचे शुल्क परत करण्याची मागणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि कॉप्स विद्यार्थी संघटना यांनी शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडे केली आहे

आम्ही आगाऊ पैसे देतो, तुम्ही इंजेक्शन आणि ऑक्सिजन घ्या ! – चंद्रकांत पाटील, भाजप, प्रदेशाध्यक्ष

देशामध्ये कोरोनाच्या दुसर्‍या लाटेमुळे संपूर्ण आरोग्य सेवा कोलमडली आहे. प्राणवायूचा अपुरा पुरवठा, बेड न मिळणे, रेमडेसिवीरचा तुटवडा अशा स्वरूपातील अत्यावश्यक सेवा कोलमडल्या आहेत.

खडक पोलीस ठाणाच्या हद्दीतील पशूवधगृहातून ३ गोवंशियांची सुटका

गोवंशियांची हत्या करणार्‍यांना कठोर शिक्षा न झाल्याचा परिणाम !

पुणे जिल्ह्यात ऑक्सिजनअभावी नवीन रुग्णांना रुग्णालयात प्रवेश बंद !

सध्या निर्माण झालेल्या ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे छोट्या रुग्णालयांना आवश्यकतेच्या जेमतेम ५० प्रतिशत ऑक्सिजनचा पुरवठा होत आहे. यामुळे नवीन रुग्ण दाखल करून घेणे रुग्णालयांना अवघड झाले आहे.

आदेशाचे उल्लंंघन करून चालू असलेल्या व्ही.एल्.सी.सी. वेलनेस अँड ब्युटी सेंटर वर पोलिसांची कारवाई !

डेक्कन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भांडारकर रस्त्यावरील व्ही.एल्.सी.सी. अँड ब्युटी सेंटर हे सलून चालू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यावर धाड टाकल्यावर ग्राहकांची अपॉइंटमेंट (वेळ घेऊन) तेथे सेवा चालू असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.

पुण्यात सराईत गुन्हेगार आणि निवृत्त पोलीस कर्मचार्‍यामधील झटापटीत गुन्हेगाराचा मृत्यू !

अनंत ओव्हाळ हे बोपोडीतील आनंदनगर परिसरात काही कामानिमित्त गेले होते. या वेळी गुन्हेगार मनिष भोसलेने त्यांची दुचाकी अडवत त्यांच्यासोबत वाद घातला. यानंतर दोघांनीही एकमेकांना मारहाण केली. या झटापटीत मनिषचा मृत्यू झाला.

पुणे शहरातील लष्करी रुग्णालयातील बेड कोरोनाबाधितांसाठी उपलब्ध करून देणार ! – प्रकाश जावडेकर, केंद्रीय मंत्री

तसेच ३ ते ४ दिवसांत महाराष्ट्राला १ सहस्र १०० ‘व्हेंटिलेटर’ मिळतील, लसीची जितकी आवश्यकता आहे, तितका साठा केंद्राकडून देण्याचा निर्णय झालेला आहे.