उत्सव ‘आदर्श’च हवेत !

उत्सव ‘आदर्श’च हवेत !

काळाचे महत्त्व ओळखून केली जाणारी कृती ही त्या काळातील ‘आदर्श कृती’ मानली जाते. सध्याच्या काळात चालू असलेले नैतिकतेचे अध:पतन थांबवण्यासाठी राष्ट्र आणि धर्म यांच्या रक्षणासाठी प्रत्येकाने कृती करणे आवश्यक आहे. त्यामुळे उत्सव ‘आदर्शच’ साजरे करायला हवेत.

भरड धान्य : काळाची आवश्यकता !

भरड धान्य : काळाची आवश्यकता !

भारतीय भरड धान्याचे महत्त्व जाणून शेतकर्‍यांनी नगदी पिकांच्या मागे न लागता ही पारंपरिक पिके घेऊन देश सुजलाम् सुफलाम् करावा ! पालकांनीही या धान्यांचे वेगवेगळे चविष्ट पदार्थ बनवून मुलांना द्यावेत. जेणेकरून मुले ‘जंक फूड’च्या मागे लागून शरिराची हानी करून घेणार नाहीत.

देशप्रेम हवे !

देशप्रेम हवे !

आपल्या आवडीनिवडी जोपासतांना त्यामध्ये देशप्रेमाचा विचार सध्याच्या किती तरुणांमध्ये आहे, हा संशोधनाचा विषय ! मेकॉलेप्रणित शिक्षणप्रणालीमुळे आजच्या तरुण पिढीमध्ये देशप्रेम शोधावे लागते. या पार्श्वभूमीवर श्री. योगेश यांच्यातील देशप्रेमाचा आदर्श सर्व तरुणांनी घ्यावा, असे वाटते.

मुलांवर संस्कार कसे कराल ?

मुलांवर संस्कार कसे कराल ?

पालकांनी धर्मशिक्षण घेणे आणि त्याप्रमाणे मुलांवर संस्कार करणे आवश्यक ! असे केल्यास मुलांमधील सत्त्वगुण वाढून त्यांच्यावर ‘संस्कार’ करणे सोपे जाईल. पालकांनो, हताश न होता स्वतः योग्य-अयोग्य समजून घ्या, त्याप्रमाणे कृती करा आणि देशासाठी सुसंस्कारित भावी पिढी घडवा !

भरकटलेली माध्यमे !

भरकटलेली माध्यमे !

माध्यमांनी योग्य-अयोग्य यांचे भान जपत आपले कर्तव्य पार पाडावे. सध्या राष्ट्र आणि धर्म संकटात असतांना त्याविषयीची वृत्ते दाखवली जात नाहीत. उलट प्रसिद्धीच्या हव्यासापायी क्षुल्लक गोष्टींचा गवगवा केला जातो. यातून राष्ट्रहित कसे साधले जाणार ?

सोलापूर शहराचा विकास कधी ?

सोलापूर शहराचा विकास कधी ?

इच्छुक युवकांना छोटे छोटे प्रकल्प निर्माण करण्यासाठी प्रोत्साहन द्यायला हवे, तसेच आवश्यक ते साहाय्य केल्यास अनेक नागरिकांचे शहराबाहेर जाण्याचे प्रमाण न्यून होऊन त्यांची क्षमता आणि बुद्धी कौशल्य यांचा वापर शहराच्या विकासासाठी होईल.

डॉक्टरांना मारहाण ?

डॉक्टरांना मारहाण ?

चुकांचा अभ्यास होणे, ज्याची चूक असेल, त्याला त्याची जाणीव करून देणे, प्रसंगी त्यावर कठोर कारवाई करणे, हेही आवश्यक आहे. त्यामुळे समस्येचे उत्तर ‘हाणामारी’ हे नसून ‘उपाययोजना’ या दृष्टीने पाहिल्यास ‘डॉक्टर म्हणजे देव’, हे समीकरण पुन्हा समाजात नक्की निर्माण होईल !

हव्यास का ?

कलियुगात ‘पैसा’ हेच सर्वस्व मानले जात आहे. त्यासाठी माणूस प्रसंगी एक नव्हे, तर दोन ठिकाणी कामे करत आहे. निवृत्त झाल्यावरही त्यातच व्यस्त रहात आहे. अरे, काय हे ? पैशामुळे जिवाला उतारवयातही आराम राहिलेला नाही.

इच्छाशक्ती आवश्यक !

इच्छाशक्ती आवश्यक !

कारणे कितीही असली, तरी विवाहाचे वय नसतांनाही मुला-मुलींचे विवाह लावून देणे, त्यांच्यावर अकाली संसाराचे दायित्व आणि मातृत्व लादणे, हा सामाजिक गुन्हाच आहे. याच्याशी संबंधित असणार्‍या सर्वांवरच कठोर कारवाई होणे आवश्यक आहे. कायदा असूनही मोठ्या प्रमाणात बालविवाह होणे, हे सर्व स्तरांवरील मोठे अपयश आहे.