पत्रकारांच्या नावाने खंडणी वसूल करणार्‍या तोतया पत्रकाराला अटक !

हा तोतया पत्रकार नवी मुंबई काँग्रेस पदाधिकारी असून नवी मुंबई महापालिकेचा कंत्राटी स्वच्छता कामगार आहे.

‘म्युकरमायकोसिस’ आजारावर नवी मुंबई महापालिकेच्या वाशी रुग्णालयात उपचार !

म्युकरमायकोसिस आजाराचे काही रुग्ण नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात आढळले असून त्यांची महापालिकेच्या वाशी, नेरूळ आणि ऐरोली येथील सार्वजनिक रुग्णालयांत पडताळणी करण्यात येत आहे.

नवी मुंबईत वाहनात बसून कोरोनाचे लसीकरण चालूू !

नवी मुंबई महापालिकेने ४५ वर्षांवरील नागरिकांना त्यातही विशेषत्वाने ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग यांना सुलभ रितीने कोरोनाची लस घेता यावी, यासाठी वाहनात बसून लस घेण्याचा (ड्राइव्ह इन लसीकरण) उपक्रम चालू केला आहे.

नवी मुंबई पालिका मुख्यालयात ऑक्सिजन पुरवठ्यावर लक्ष ठेवण्यासाठी ‘वॉर रूम’ कार्यान्वित !

येथे उपायुक्त डॉ. बाबासाहेब राजळे यांच्या नियंत्रणाखाली ६ जणांचे पथक कार्यरत आहे. येथून सकाळी ७ ते ११ या वेळेत महानगरपालिका आणि खासगी अशा सर्व कोविड रुग्णालयीन सुविधेतील ऑक्सिजनच्या साठ्याचा प्रति ३ घंट्यांनी आढावा घेतला जात आहे.

४ दिवसांत महानगरपालिका कोविड केंद्रांसह सर्व खासगी रुग्णालयांचे फायर, ऑक्सिजन आणि स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे आयुक्तांचे निर्देश

नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी तातडीने संबंधित अधिकार्‍यांंची बैठक घेत महानगरपालिका क्षेत्रातील महानगरपालिकेच्या कोविड केंद्रांसह सर्व खासगी रुग्णालयांचे फायर, ऑक्सिजन आणि स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे निर्देश दिले आहेत

नवी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी प्रभागानुसार प्रारूप मतदार सूची प्रसिद्ध

मतदार सूचींवर नागरिकांकडून हरकती आणि सूचना कार्यालयीन वेळेत स्वीकारण्यात येणार आहेत.

बजरंग सेनेचे अध्यक्ष पितांबर जाधव यांच्यावर पुन्हा आक्रमण

हिंदुत्वनिष्ठांवर सातत्याने आक्रमण करण्याची मुजोरी धर्मांधांनी करणे, हा गेल्या ७३ वर्षांत शासकीय स्तरावरून केल्या जाणार्‍या लांगूलचालनाचा परिणाम आहे. अशा प्रकारे हिंदुत्वनिष्ठांवर सातत्याने आक्रमण होणे, ही पोलिसांसाठीही लाजीरवाणी गोष्ट आहे !

कोरोनाची चाचणी न केलेल्या व्यक्तींचा अहवाल निगेटिव्ह दिल्याप्रकरणी एक आधुनिक वैद्य निलंबित

चाचणी न करता अहवाल निगेटिव्ह दिल्याच्या प्रकरणी नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त अभिजीत बांगर यांनी आधुनिक वैद्य सचिन नेमाडे यांना निलंबित केले आहे.

नवी मुंबईत चाचणी न केलेल्या व्यक्तींचे कोरोना अहवाल दिले !

कहर म्हणजे काही वर्षांपूर्वी मृत झालेल्या व्यक्तीचाही कोरोनाचा पडताळणी अहवाल देण्याचा प्रकार घडला आहे. या प्रकरणी विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी आयुक्तांची भेट घेऊन दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

मालमत्ताकर, पाणीपट्टी ‘ऑनलाईन’ भरण्याचे महानगरपालिकेचे आवाहन

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाने ३१ मार्चपर्यंत ‘लॉकडाऊन’ घोषित केला असून या कालावधीत नागरिकांच्या आरोग्य हिताच्या दृष्टीने न्यूनतम संपर्कात येणे, त्याचप्रमाणे गर्दी टाळणे आवश्यक आहे.