ऑगस्टपासून मुंबई उच्च न्यायालयात प्रत्यक्ष सुनावणी चालू होणार !

मुंबई – ऑगस्टच्या पहिल्या सोमवारपासून मुंबई उच्च न्यायालयात सुनावणीला प्रारंभ होणार आहे. आठवड्यातील ४ दिवस न्यायालयाचे काम चालू असणार आहे. यामध्ये ३ दिवस प्रत्यक्ष, तर १ दिवस ‘ऑनलाईन’ कामकाज चालेल. मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांच्या अध्यक्षतेखालील प्रशासकीय समितीने हा निर्णय घेतला आहे. कोरोनाचा अधिक धोका असलेल्या पुणे, सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर, रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, पालघर, बीड आणि नगर या ११ जिल्ह्यांमधील कनिष्ठ न्यायालये अर्धा दिवस कार्यरत रहातील, असे निश्चित करण्यात आले आहे. उर्वरित जिल्ह्यांमध्ये न्यायालयाचे काम पूर्ण दिवस होणार आहे.