‘द केरल स्टोरी’ चित्रपटाचा दुसरा भाग येणार !  

‘द केरल स्टोरी’ चित्रपटाचा दुसरा भागही लवकरच बनवण्यात येईल, अशी माहिती चित्रपटाचे दिग्दर्शक सुदीप्तो सेन यांनी अप्रत्यक्षपणे एका मुलाखतीमध्ये दिली. सुदीप्तो सेन म्हणाले की, माझ्याकडे अशा अनेक कथा आहेत, ज्या मी लोकांपर्यंत पोचवू इच्छितो.

मुंबईमध्ये बनावट सीमकार्ड बनवणारी यंत्रणा कार्यरत, १३ जणांना अटक !

आतापर्यंत बनावट सीमकार्ड सिद्ध करणार्‍या १३ जणांना पोलिसांनी अटक केली आहे.

नवी मुंबई येथे ‘द केरल स्टोरी’ चित्रपटाचे विनामूल्य आयोजन !

भाजपचे आमदार गणेश नाईक यांच्या वतीने नवी मुंबई भाजपच्या वतीने ‘द केरल स्टोरी’ या चित्रपटाचे पाम बीच गॅलरी या चित्रपटगृहात विनामूल्य आयोजन केले होते.‌

विज्ञापनाद्वारे स्वतःची प्रतिमा मलीन केल्याचा आरोप !

भारताचे प्रसिद्ध माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांनी त्यांची प्रतिमा मलीन केल्याविषयी मुंबई पोलिसांकडे अज्ञात व्यक्तीविरोधात तक्रार प्रविष्ट केली आहे.

लोकमान्य टिळक टर्मिनस येथे प्रवाशाचा भ्रमणभाष चोरणार्या धर्मांधाला अटक !

लोकमान्य टिळक टर्मिनस येथील तिकीट आरक्षण कार्यालयाजवळ झोपलेल्या एका प्रवाशाचा भ्रमणभाष चोरणार्‍या मतीन अन्सारी (वय २२ वर्षे) या आरोपीला आर्.पी.एफ्.च्या जवानांनी रंगेहात पकडले.

मुंबई शहरात १७ ठिकाणी ‘हिरकणी कक्ष’ उभारणार !

सार्वजनिक ठिकाणी तान्ह्या बाळाला दूध पाजतांना महिलांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी राज्याच्या महिला आणि बाल कल्याण विकास विभागाने मुंबई शहरात १७ ठिकाणी ‘हिरकणी कक्षा’ची उभारणी करण्याचा निर्णय घेतला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हेलिकॉप्टरमध्ये बिघाड !

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सातारा दौरा नियोजित होता; पण त्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये बिघाड झाला. त्यामुळे त्यांचा दौरा अचानक रहित करण्यात आला आहे.

अमली पदार्थ नियंत्रण विभागाचे समीर वानखेडे यांच्या विरोधात भ्रष्टाचारप्रकरणी गुन्हा नोंद !

आंतरिक राजस्व सेवा (internal revenue service) अधिकारी समीर वानखेडे यांच्या विरोधात भ्रष्टाचार प्रकरणात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

१८ गुन्हे नोंद असलेल्या धर्मांधाला अटक !

इतके गुन्हे नोंद होईपर्यंत पोलीस काय करत होते ? पहिल्याच गुन्ह्याच्या वेळी त्याच्यावर कारवाई का केली नाही ?

माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्यावरील सर्व आरोप मागे आणि निलंबन रहित !

महाराष्ट्र सरकारने मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्यावरील सर्व आरोप मागे घेतले आहेत. ‘निलंबनाचा कालावधी ‘ऑन ड्युटी’ (कामावर उपस्थित) असल्याचे मानले जावे’, असे आदेशात म्हटले आहे.