युवतींचा उत्स्फूर्त प्रतिसाद !
नवी मुंबई, १४ मे (वार्ता.) – भाजपचे आमदार गणेश नाईक यांच्या वतीने नवी मुंबई भाजपच्या वतीने ‘द केरल स्टोरी’ या चित्रपटाचे पाम बीच गॅलरी या चित्रपटगृहात विनामूल्य आयोजन केले होते. भारतीय मुलींचे धर्मांतर करून त्यांना ‘इस्लामिक स्टेट’सारख्या अतिरेकी संघटनेमध्ये काम करण्यास भाग पाडणार्या वास्तवाचा खुलासा करणारा हा चित्रपट आहे. नवी मुंबईतील युवतींनी चित्रपट पहाण्यासाठी गर्दी केली होती. माजी खासदार डॉ. संजीव नाईक आणि समाजसेविका कल्पनाताई नाईक यांनीही या वेळी हा चित्रपट पाहिला. ‘देशातील नागरिकांनी हा चित्रपट पहाणे आवश्यक आहे’, असे आवाहन या वेळी डॉ. नाईक यांनी केले.
‘आपल्या माता-भगिनींचे ‘ब्रेनवॉश’ करून त्यांचे धर्मांतर केले जाते. त्यांच्यावर अत्याचार केले जातात. हा चित्रपट पाहून जनतेने आपले मत बनवावे आणि भविष्यात अशा घटना पुन्हा होणार नाहीत, याची काळजी घ्यावी’, असे आवाहन समाजसेविका कल्पनाताई नाईक यांनी केले.
Ganesh Naik की पहल | Navi Mumbai में “The Kerala Story” Movie की Free Screening | Sanjeev Naikhttps://t.co/Cuux1yePLb#NaviMumbaiNetwork #GaneshNaik #SanjeevNaik #TheKeralastory #NaviMumbai @Dev_Fadnavis @iGaneshNaik @_thekeralastory @navimumbaicv @BJP4Maharashtra
— Navi Mumbai Network (@NaviMumbaiNet) May 13, 2023
‘द केरल स्टोरी’मुळे युवतींमध्ये निश्चितच जागृती होईल ! – युवतींच्या प्रतिक्रिया
‘आजची युवा पिढी झटकन एखाद्या आकर्षणाला बळी पडते आणि पुढे जाऊन मोठ्या संकटामध्ये सापडते. हे टाळायचे असेल, तर जनजागृती करणे आवश्यक आहे’, असे मत त्यांनी मांडले. ‘द केरल स्टोरी’ या चित्रपटामधून धर्मांतराच्या सुनियोजित षड्यंत्राविषयी माहिती मिळून युवतींमध्ये निश्चितच जागृती होईल, अशा प्रतिक्रिया हा चित्रपट पहाण्यासाठी आलेल्या युवतींकडून व्यक्त करण्यात आल्या.