सिंधुदुर्ग : हत्तींची समस्या सोडवण्यासाठी अन्नत्याग आंदोलन करण्याची चेतावणी

ही समस्या अनेक वर्षांची असून ती सोडवण्यात वनविभाग अपयशी ठरला आहे. सातत्याने होणार्‍या हानीमुळे ग्रामस्थ आणि शेतकरी यांचे मनोबलही खचले आहे.

(गोवा) अनेक हेक्टर भूमी लुटली : भूमी लुटण्यामध्ये सरकारी अधिकार्‍यांचा हात असल्याचा अन्वेषण अधिकार्‍यांचा दावा

भूमी बळकावल्याच्या प्रकरणांतील सरकारी अधिकार्‍यांवर कठोरातील कठोर कारवाई झाली, तरच पुन्हा कुणीही भ्रष्टाचार करण्यास धजावणार नाही !

सातारा शहरातील पश्चिम भागात किडे आणि अळ्यामिश्रित पाणीपुरवठा !

शहराच्या पश्चिम भागात गत ३ मासांपासून कधी गाळमिश्रित, तर कधी किडे, अळ्यामिश्रित पाणीपुरवठा होत आहे. यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून नागरिक प्रचंड संताप व्यक्त करत आहेत.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात वीजपुरवठ्याची समस्या गंभीर !

सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनेक ठिकाणी गेले काही दिवस वीजपुरवठ्यात सातत्याने पालट होत असून कधी अल्प, तर कधी उच्च दाबाचा वीजपुरवठा होत आहे. सातत्याने पालटणार्‍या या विजेच्या दाबामुळे विजेच्या उपकरणांची हानी होत आहे.

राज्यातील २४ लाख ६० सहस्र विद्यार्थी बनावट !

इतक्या मोठ्या प्रमाणात बनावट आधारकार्ड निर्माण होईपर्यंत पोलीस आणि प्रशासन झोपले होते का ? या प्रकरणातील सर्व दोषींना कठोर शिक्षा केली पाहिजे !

रंगकाम करणारे कामगार सुरक्षा साहित्‍याविना !

येथील महानगरपालिकेच्‍या मुख्‍यालयामध्‍ये उंचावरील काम करतांना कामगारांना सुरक्षेची साधने पुरवली गेलेली नाहीत.

धुळे-मनमाड-दादर एक्‍सप्रेसला आणखी ४ डबे जोडणार !

दैनंदिन चाकरमानी, व्‍यावसायिक, उद्योजक, विद्यार्थी यांच्‍या मागण्‍या लक्षात घेऊन आता या गाडीस आणखी ४ नवीन डबे जोडण्‍याचा निर्णय घेण्‍यात आला आहे.

सानपाडा येथे जलवाहिनीत मृत कबूतर आढळले !

सानपाडा येथे जलवाहिनीत मृत कबूतर आढळून आले आहे. याची महापालिकेकडून त्वरित नोंद घेऊन संबंधित सोसायटीची पाण्याची टाकी स्वच्छ केली आहे.

सोलापूर शहरातून मागील दीड वर्षांत ११४ अल्पवयीन मुलींचे अपहरण !

एवढ्या मोठ्या संख्येत मुलींचे अपहरण होणे पोलिसांना लज्जास्पद ! पोलिसांनी गुन्हेगारांवर वचक निर्माण करणे आवश्यक आहे !

अवैधपणे होणारी अमली पदार्थ विक्रीच्या विरोधात तातडीने कारवाई करा अन्यथा आंदोलन !

प्रशासनाला अशी चेतावणी का द्यावी लागते ? खरे तर प्रशासनानेच स्वत:हून अमली पदार्थांच्या विरोधात कारवाई करायला हवी !