रंगकाम करणारे कामगार सुरक्षा साहित्‍याविना !

नवी मुंबई महापालिका मुख्‍यालयातील प्रकार !

सुरक्षा साधानांविना काम करणारे कामगार

नवी मुंबई – येथील महानगरपालिकेच्‍या मुख्‍यालयामध्‍ये उंचावरील काम करतांना कामगारांना सुरक्षेची साधने पुरवली गेलेली नाहीत. ती साधने वापरण्‍याची सक्‍त ताकीद महापालिकेकडून खासगी विकासक आणि ठेकेदार यांना दिली जाते; मात्र याच आदेशाचे उल्लंघन येथे होत आहे. (सुरक्षेची साधने न पुरवणे म्‍हणजे कामगारांच्‍या जिवाशी खेळण्‍याचाच प्रकार होय ! – संपादक) महानगरपालिकेच्‍या बेलापूर येथील मुख्‍यालयात रंग देण्‍याचे काम चालू आहे. या प्रकरणी हलगर्जीपणा करणार्‍या अधिकार्‍यांवर कारवाई करण्‍याची मागणी केली जात आहे.

परांचीवर चढून रंगकाम करणार्‍या कामगारांकडे साधी चप्‍पलही नाही. सुरक्षा हेल्‍मेट, गमबूट, हातमोजेही त्‍यांनी घातले नव्‍हते. महापालिकेचे आयुक्‍त राजेश नार्वेकर यांच्‍यासह शहर अभियंता विभागातील सर्व अधिकारी मुख्‍यालयात प्रतिदिन उपस्‍थित असतांनाही ही घटना कुणाच्‍याही लक्षात आली नाही.

संपादकीय भूमिका :

कामगारांच्‍या जिवाशी खेळणार्‍या महापालिकेतील संबंधितांना वेळीच खडसवायला हवे !