नाशिक येथे वीज अभियंता ४० सहस्रांची लाच घेतांना अटक !

घोटी आणि वैतरणा भागातील एका उद्योजकाला वीज मीटरवर वाढीव भार संमत करून देण्‍याच्‍या मोबदल्‍यात ४० सहस्र रुपयांची लाच स्‍वीकारणारे वीज वितरण आस्‍थापनाचे साहाय्‍यक अभियंताला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडून अटक केली.

अत्यंत अस्वच्छता, मोकाट जनावरे, इमारतीची दुरवस्था यांसह अनेक समस्या असलेले अक्कलकोट बसस्थानक !

स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी केवळ महाराष्ट्र आणि कर्नाटक येथूनच नाही, तर संपूर्ण भारतभरातून भाविक येतात, त्या अक्कलकोट बसस्थानकाची स्थिती अत्यंत वाईट आहे.

‘आदर्श शाळा पुरस्कार’प्राप्त आचरा केंद्रशाळेत शिक्षकांची पदे रिक्त

‘केंद्रशाळा आचरा क्रमांक १’ या शाळेतील शिक्षकांची रिक्त पदे भरण्याच्या मागणीकडे प्रशासन सातत्याने दुर्लक्ष करत आहे, असा आरोप करत शिक्षकांची पदे न भरल्यास नव्या शैक्षणिक वर्षापासून शाळा बंद ठेवण्याची संतप्त भूमिका शाळा व्यवस्थापन समितीने घेतली आहे

वास्को येथे भटक्या कुत्र्यांनी महिलेच्या डोक्यासह शरिराला चावे घेतले

भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी स्थानिकांकडून होत आहे. कुत्र्यांच्या उपद्रवावर शासनाने कठोरतेने पावले उचलणे आवश्यक आहे.श्वानप्रेमी संघटनांना याविषयी काय म्हणायचे आहे ?

कोंढवा (पुणे) येथील शाळेत आतंकवादी प्रशिक्षण चालू असल्याचे पोलिसांना आधी का लक्षात आले नाही ? – डॉ. रिंकू वढेरा, लेखिका आणि इतिहास तज्ञ

प्रशासनाने या परिसरातील नागरिकांच्या हालचालींकडे बारकाईने लक्ष ठेवणे आवश्यक होते. हिंदूंनी जागरूक राहून कुठेही अवैध किंवा अयोग्य कृती होतांना दिसल्यास त्या विरोधात त्वरित आवाज उठवायला हवा.

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्‍या हद्दीतील होर्डिंगची त्‍यांच्‍याकडे नोंदच नाही !

पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकांच्‍या हद्दीत अधिकृत आणि अनधिकृत होर्डिंगची संख्‍या मोठी आहे; मात्र पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडे त्‍यांच्‍या हद्दीतील एकाही होर्डिंगची नोंद नाही.

पुणे महापालिकेचे स्‍थानिक संस्‍था करातून मिळणार्‍या महसूलाकडे दुर्लक्ष !

स्‍थानिक संस्‍था कराच्‍या (लोकल बॉडी टॅक्‍स) प्रलंबित प्रकरणांमधून मिळणार्‍या किमान २०० कोटींच्‍या उत्‍पन्‍नावर महापालिका प्रशासनाने पाणी सोडल्‍याचे वास्‍तव समोर आले आहे.

छत्रपती संभाजीनगर येथे बनावट धर्मांध वैद्याची आरोग्‍य विभागात नियुक्‍ती !

अनेक ठिकाणच्‍या गुन्‍हेगारीत धर्मांध पुढे असतात, हे सिद्ध होते. ४ वर्षे बनावट कागदपत्रांद्वारे वैद्याची नोकरी करून रुग्‍णांच्‍या जिवाशी खेळणार्‍या धर्मांधाला कठोर शिक्षा करून व्‍याजासह वेतनाची रक्‍कमही वसूल करायला हवी !

सातबारा उतार्‍याची प्रत देणारे यंत्र ३ वर्षांहून अधिक काळ धूळखात पडून !

‘ए.टी.एम्.’ सारख्‍या दिसणार्‍या एका यंत्रात काही नाणी टाकल्‍यावर सामान्‍य नागरिकांना तात्‍काळ सात-बारा उतारे मिळतील, अशी व्‍यवस्‍था करण्‍यात आली होती. ही यंत्रे सुमारे ३ वर्षांपूर्वी काही जिल्‍हाधिकारी कार्यालयांत बसवण्‍यात आली होती.

पिंपरी-चिंचवड शहरातील निम्‍म्‍यापेक्षा अधिक पोलीस ठाण्‍यांतील दूरभाष क्रमांक बंद !

पोलीस ठाण्‍यासारख्‍या महत्त्वाच्‍या विभागातील दूरभाष क्रमांक बंद असणे, म्‍हणजे जनतेला एकप्रकारे फसवण्‍याचाच प्रकार झाला. असे पोलीस खाते कायद्याचे राज्‍य देणार का ? वरिष्‍ठांनी यामध्‍ये लक्ष घालून जनतेला दिलेले क्रमांक चालू ठेवावेत, ही अपेक्षा !