वाडा (जिल्‍हा पालघर) येथे नाल्‍यात लाखो मृत माशांचा खच !

आस्‍थापनांमधून सोडण्‍यात येणार्‍या रसायनमिश्रीत पाण्‍यावर नियंत्रण आणण्‍यासाठी प्रशासन कधी जागे होणार ?

नेवासा शहरातून प्रवरा नदीत जाणार्‍या दूषित, रक्‍तमिश्रीत पाण्‍याविषयी ठोस कारवाई करावी ! – नागरिकांची मागणी

नागरिकांना अशी मागणी का करावी लागते ? प्रशासनाला दिसत नाही का ?

मुंब्रा येथे उघड्यावर पडलेल्‍या विद्युत्‌वाहिनीच्‍या झटक्‍याने एकाचा मृत्‍यू !

निष्‍काळजीपणा करून नागरिकांच्‍या जिवाशी खेळणार्‍या वीज वितरण आस्‍थापनावर कठोर कारवाई करायला हवी !

लांजा येथे शिलालेखात हुतात्मा सैनिकाचे आडनाव चुकवल्यामुळे कनावजे कुटुंबियांकडून नाराजी व्यक्त !

नावाची निश्चिती न करताच शिलालेखाचे अनावरण करणे, हा नगरपंचायत प्रशासनाचा दायित्वशून्यपणाच होय ! असे प्रशासन कसा कारभार करत असेल ? याचा विचारच न केलेला बरा !

हरियाणा पोलिसांचा हिंदुद्वेष :‘त्रिशूळ’ला संबोधले ‘प्राणघातक शस्त्र !’

हिंदूंसाठी पवित्र असलेल्या त्रिशुळाचा अवमान करणार्‍या हरियाणा पोलिसांकडून हिंदूंना कधीतरी न्याय मिळेल का ? पोलीस अन्य पंथियांच्या श्रद्धास्थानांच्या संदर्भात असे वक्तव्य करण्याचे धाडस कधी दाखवत नाहीत, हे लक्षात घ्या !

चावडी, काणकोण (गोवा) येथील सरकारी प्राथमिक शाळेच्या संरक्षक भिंतीला मद्यालयाच्या मालकाचा विरोध

शाळेजवळील मद्यालय बंद करून त्याला अनुज्ञप्ती देणार्‍या अबकारी खात्याच्या अधिकार्‍यांवर कारवाई व्हायला हवी !

राहुरीत (अहिल्‍यानगर) पुन्‍हा ‘लव्‍ह जिहाद’ !

यामागचे धागेदोरे शोधून काढण्‍यास पोलीस प्रशासन पूर्णपणे अयशस्‍वी ठरले असून या घटनेचे अन्‍वेषण सीबीआय किंवा इतर संस्‍थेला देण्‍यात यावे, अशी मागणी राहुरी तालुक्‍यातून होत आहे.

छत्रपती संभाजीनगरच्‍या विद्यार्थ्‍यांना नागपूर, अमरावती येथील परीक्षा केंद्र !

छत्रपती संभाजीनगर ते नागपूर हे अंतर ४५० किलोमीटरचे आहे, तर अमरावती ते छत्रपती संभाजीनगर हे अंतरही ३१३ किलोमीटर इतके आहे. त्‍यामुळे विद्यार्थी संतप्‍त आहेत.

कळवा (ठाणे) रुग्णालयात आणखी ४ रुग्णांचा मृत्यू

छत्रपती शिवाजी महाराज रुग्‍णालयात १० ऑगस्‍टच्‍या रात्री ६ जणांचा मृत्‍यू झाल्‍याची घटना घडल्‍यावर राजकीय वातावरण तापले असतांनाच मागील २४ घंट्यांत १८ जणांचा मृत्‍यू झाला, तर १४ ऑगस्‍टला आणखी ४ रुग्‍णांचा मृत्‍यू झाल्‍याची माहिती रुग्‍णालय प्रशासनाने दिली आहे.

माळीणमुळे विस्‍थापित झालेल्‍यांच्‍या घरांसाठी दिलेले ४३ लाख रुपये ठेकेदाराने हडपले !

नागरिकांना घरांऐवजी रहावे लागत आहे ‘पोल्‍ट्री फार्म’मध्‍ये !