सातारा नगर परिषदेच्या जलवाहिनीच्या गळतीमुळे लाखो लिटर पाणी वाया !

यासाठी उत्तरदायी कर्मचारी आणि अधिकारी यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्याची तत्परता नगर परिषद प्रशासन दाखवणार का ?

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठातील विद्यार्थिनींच्या पोह्यामध्ये अळी आणि उपम्यामध्ये केस आढळले !

विद्यार्थ्यांना निकृष्ट अन्न देणार्‍या विद्यापीठ प्रशासनातील संबंधितांची चौकशी करून कारवाई केव्हा होणार ?

जामखेड (अहिल्यानगर) येथील ‘रत्नदीप मेडिकल फाऊंडेशन अँड रिसर्च सेंटर’चे अध्यक्ष डॉ. भास्कर मोरे यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा नोंद !

पोलिसांनी केवळ गुन्हा नोंद करून न थांबता वासनांध अध्यक्षांना बडतर्फच करायला हवे !

संपादकीय : इस्लामी आतंकवादाचा स्फोट !

आतंकवादाविषयी राज्य सरकारांमध्ये असलेले अल्प गांभीर्य आणि अन्वेषण यंत्रणांचा सुस्त कारभार आतंकवाद्यांच्या पथ्यावर !

खडकत (जिल्हा बीड) येथील ५ अवैध पशूवधगृहांवर कारवाई !

प्रशासनाने कठोर पावले उचलली, तर अवैध पशूवधगृहे वाढणार नाहीत.

नागरिकांकडून पैशांची मागणी करणार्‍या ‘ऑपरेटर’वर कारवाई न केल्यास आंदोलन करू ! – शंभुराज काटकर, उपजिल्हाप्रमुख, ठाकरे गट

या प्रकरणी प्रशासन काय कारवाई करणार, हे स्पष्ट केले पाहिजे.

नागपूर येथे १ सहस्र ५०० किलो सडलेली सुपारी जप्त !

आरोग्याविषयी असंवेदनशील असणार्‍यांवर कारवाई कधी होणार ?

अक्कलकोट शहराला पाणीपुरवठा करणार्‍या जलवाहिनीला गळती !

पाण्याची इतकी टंचाई असतांना या गळतीकडे प्रशासन त्वरित लक्ष का देत नाही ? यासाठी उत्तरदायी कर्मचार्‍यांवर योग्य कारवाई होणे आवश्यक.

पोलिसांकडून केवळ ४० टक्केच गुन्ह्यांची माहिती प्रसिद्ध !

गुन्हे मोठ्या प्रमाणात घडत असतांना पोलिसांनी अशी अपुरी माहिती देण्यामागील कारणांचा शोध घ्यायला हवा ! पोलीसच अशी लपवाछपवी करू लागले, तर राज्यात कायदा-सुव्यवस्था कोण राखणार ?

अधिक तिकीटदर आकारणार्‍या २२३ वाहनांवर कारवाई !

खासगी ट्रॅव्हल्सच्या नियमबाह्य तिकीटदराच्या विरोधातील हिंदु जनजागृती समितीच्या ‘सुराज्य अभियाना’च्या पाठपुराव्याचा परिणाम !