लांजा नगरपंचायत प्रशासनाचा हुतात्मा सैनिकांप्रतीचा कृतघ्नपणा जाणा !
लांजा – येथे हुतात्मा सैनिकांच्या नावाने उभारण्यात आलेल्या शिलालेखावर हुतात्मा सैनिक प्रदीप यशवंत कनावजे यांचे आडनावच चुकल्याने येथील कनावजे कुटुंबियांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. या शिलालेखात कनावजे यांचे आडनाव ‘कानवजे’ असे कोरण्यात आले आहे. प्रदीप यशवंत कनावजे हे ‘ऑपरेशन रक्षक’ मोहिमेत देशाच्या रक्षणासाठी ६ मार्च १९९७ या दिवशी हुतात्मा झाले होते. त्यांचा येथील साटवली रस्त्यावर उद्यानाजवळ शिलालेख उभारण्यात आला आहे. या शिलालेखाचे अनावरण १४ ऑगस्टला करण्यात आले.
शहीद जवानाच्या नावाने उभारलेल्या शिलालेखात जवानाचे नावच चुकले! https://t.co/MVqcY0Qlj9
— DigiKokan (@DigiKokan) August 17, 2023
अमृत महोत्सवी स्वातंत्र्यदिनाच्या सांगता सोहोळ्याच्या निमित्ताने संपूर्ण देशात हुतात्मा सैनिकांचे शिलालेख उभारण्यात आले आहेत. देशसेवेसाठी हौतात्म्य पत्करलेल्या सैनिकांची नावे त्या त्या गावांत उभारण्यात आलेल्या शिलालेखांवर कोरण्यात आली आहेत. ‘हुतात्मा सैनिकांच्या प्रती प्रत्येक गावात आदराची भावना निर्माण व्हावी आणि हे शिलालेख प्रेरणादायी ठरावेत’, हा त्यामागचा हेतू आहे.
हुतात्मा सैनिकाच्या कुटुंबियांना कार्यक्रमाचे ऐनवेळी आणि तेही तोंडी निमंत्रण !प्रशासनाकडून हुतात्मा सैनिक प्रदीप यशवंत कनावजे यांच्या कुटुंबियांना शिलालेखाच्या अनावरणाच्या कार्यक्रमाचे ऐनवेळी आणि तेही तोंडी निमंत्रण देण्यात आले. त्यामुळे कनावजे कुटुंबियांतील रमेश कनावजे, दिलीप कनावजे, संतोष कनावजे, अशोक कनावजे, संदीप कनावजे आदींनी तीव्र नाराजी व्यक्त केली. (हुतात्मा सैनिक आणि त्यांचे कुटुंबीय यांचा याहून मोठा अवमान दुसरा कुठला असेल ! अशांवरही सरकारने तात्काळ कारवाई केली पाहिजे !) |
स्थानिक प्रशासनाचे केंद्रशासनाकडे बोट !नाव चुकल्याविषयी स्पष्टीकरण देतांना नगरपंचायत प्रशासन म्हणाले, ‘‘सदरहू नावे ही केंद्रशासनाच्या सैनिक मंत्रालयाकडून प्राप्त झाली आहेत. त्यानुसारच ती शिलालेखात कोरण्यात आली आहेत.’’ यावर कनावजे कुटुंबियांनी ‘प्रशासनाने याविषयी आम्हाला प्रारंभीच विश्वासात घेतले असते, तर हे नाव योग्य तर्हेने कोरले गेले असते’, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. |
संपादकीय भूमिका
|