आषाढी एकादशीच्‍या निमित्ताने  श्री महालक्ष्मीदेवीची श्री विठ्ठल-रुक्‍मिणीच्‍या रूपात पूजा !

आषाढी एकादशीच्‍या पार्श्‍वभूमीवर कोल्‍हापूर येथील साडेतीन शक्‍तीपिठांपैकी एक असलेल्‍या श्री महालक्ष्मीदेवीची श्री विठ्ठल-रुक्‍मिणीच्‍या रूपात पूजा बांधण्‍यात आली होती.

माजी नगरसेविका शुभदा पाटील आणि साहाय्‍यक पोलीस निरीक्षक राहुल राऊत यांना ५ दिवस पोलीस कोठडी !

या दोघांना कोल्‍हापूर पोलिसांनी सोलापूर येथून कह्यात घेतले आणि न्‍यायालयात उपस्‍थित केले. आत्‍महत्‍या करण्‍याच्‍या पूर्वी संतोष शिंदे यांनी लिहिलेल्‍या चिठ्ठीत पुण्‍यातील अन्‍य दोघांचीही नावे असून पोलीस या प्रकरणाचे अधिक अन्‍वेषण करत आहेत.

आदित्‍य ठाकरे यांच्‍या आरोपांना पत्रकार परिषद घेऊन सडेतोड प्रत्‍युत्तर देणार ! – दीपक केसरकर, शालेय शिक्षणमंत्री

दीपक केसरकर म्‍हणाले, ‘‘आदित्‍य ठाकरे यांच्‍यासारख्‍या तरुणांना शिकवणारे दुसरेच कुणीतरी आहे. ‘खोटे बोला; पण रेटून बोला’, असे करून आमच्‍यावर खोटे आरोप करत आहेत.

कोल्‍हापूर येथे ‘रग्‍गेडियन जिम’च्‍या वतीेने रक्‍तदान शिबिर !

‘रग्‍गेडियन फिटनेस’ ही व्‍यायामशाळा कोल्‍हापुरातील अत्‍याधुनिक आणि पूर्णतः वातानुकूलित व्‍यायामशाळा आहे. ‘रग्‍गेडियन’ नेहमीच आरोग्‍य आणि खेळ संस्‍कृतीला चालना देण्‍यासाठी बर्‍याच वर्षांपासून कार्य करीत आहे. आरोग्‍य शिबिराच्‍या माध्‍यमातूनही काम चालू आहे.

कोल्‍हापूरमध्‍ये ‘सद़्‍भावना रॅली’च्‍या नावाखाली कायदा-सुव्‍यवस्‍था बिघडवण्‍याचा डाव !

मुख्‍यमंत्र्यांच्‍या नावे असलेल्‍या निवेदनात म्‍हटले आहे की, गेल्‍या दोन मासांपासून धर्मांधांकडून जाणीवपूर्वक होत असलेल्‍या घटनांमुळेच ७ जून या दिवशी हिंदूंचा उद्रेक झाला. त्‍यामुळे ही शांतता बिघडवण्‍याचे काम कोण करत आहे ? याचे अन्‍वेषण अगोदर झाले पाहिजे. औरंगजेबाचे ‘स्‍टेटस’ ठेवण्‍यामागील मुख्‍य सूत्रधार कोण आहे ? याचे विशेष पोलीस पथकाद्वारे अन्‍वेषण केले जावे.

माजी नगरसेविका आणि पोलीस अधिकारी यांवर १ कोटी रुपयांची खंडणी मागितल्‍याचा आरोप

संतोष शिंदे यांनी आत्‍महत्‍या करण्‍याच्‍या पूर्वी एक चिठ्ठी लिहिली असून त्‍यात १ कोटी रुपयांच्‍या खंडणीच्‍या प्रकरणी माजी नगरसेविका आणि एक पोलीस अधिकारी यांनी त्रास दिल्‍याचे नमूद केले आहे.

पंचगंगा नदीमध्‍ये मिसळले जाते सांडपाणी !

प्रतिदिन लाखो लिटर मैलामिश्रित सांडपाणी पंचगंगा नदीमध्‍ये मिसळले जात आहे. त्‍यामुळे नदीकाठी रहाणार्‍या गावकर्‍यांचे आरोग्‍य धोक्‍यात आले आहे.

दोन निष्पाप हिंदुत्वनिष्ठांची निर्दोेष मुक्तता झाल्याप्रकरणी आरोपींचे अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांचा अधिवक्त्यांच्या हस्ते सत्कार !  

गुजरात येथील बेस्ट बेकरी प्रकरणातील हिंदुत्वनिष्ठ आरोपींच्या बाजुने खटला लढवून त्यांचे निर्दोषत्व उत्कृष्टपणे सिद्ध केल्याविषयी इचलकरंजी येथील अधिवक्त्यांच्या वतीने हिंदु विधीज्ञ परिषदेचे अध्यक्ष तथा अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

पोलिसांनी शिकवल्‍यानुसार पंच नितीन जाधव साक्ष देत आहेत ! – अधिवक्‍ता वीरेंद्र इचलकरंजीकर, अध्‍यक्ष, हिंदु विधीज्ञ परिषद

संशयित आरोपीच्‍या अधिवक्‍त्‍यांनी समीर गायकवाड यांच्‍या अटकेचा पंचनामा करणारे पंच नितीन जाधव यांची उलट तपासणी घेतली. त्‍या वेळी पंच नितीन जाधव यांनी विचारलेल्‍या प्रश्‍नांना उत्तर न देता वेळकाढूपणा करत होते, तसेच एकाच प्रश्‍नाची वेगवेगळी उत्तरे देत होते.

मरणासन्न पुरोगामित्व आणि कोल्हापुरी हिंदुत्व !

संपूर्ण महाराष्ट्रात सध्या कोल्हापूर येथे माध्यम-घोषित कथित दंगलीची चर्चा आहे. यामध्ये पुरोगामित्वाचा फुटका ढोल बडवणारे आघाडीवर असले, तरी त्यांना तो बडवावा लागतो, यातूनच कोल्हापूरचे हिंदुत्वनिष्ठ स्वरूप स्पष्ट होत आहे. येथे पुरोगाम्यांना कळत नाही की, ‘कोल्हापूर पुरोगामी कि हिंदुत्ववादी ?