ऑनलाईन’ सत्संग ऐकून ‘साधना करून लवकर गुरुमाऊलीच्या चरणांशी जायचे आहे’, या तळमळीने साधनेला आरंभ करणार्या फलटण, सातारा येथील श्रीमती मालन भापकर !
मालनताई भावपूर्णरित्या नामस्मरण आणि प्रार्थना करतात. त्या घरातील सर्व कामे सेवा म्हणून करतात. ‘प्रतिदिन सत्संग ऐकायला मिळावा’, अशी त्यांची तळमळ असते. सत्संगात सांगितलेल्या सर्व गोष्टी त्या लगेच कृतीत आणतात.