१. आनंदी
‘दुर्गाकाकूंचे पाय दुखत असतात, तरी त्या आनंदी आणि उत्साही असतात.
२. जवळीक साधणे
काकू साप्ताहिक ‘सनातन प्रभात’च्या १०७ अंकांचे वितरण करायच्या. त्यांची वाचकांशी जवळीक असून त्यांनी वाचकांना प्रेमाने जोडून ठेवले आहे.
३. ‘दुसर्यांची साधना व्हावी’, अशी तळमळ
अ. ‘यजमानांची सेवा व्हावी’, या तळमळीने काकू त्यांच्या समवेत ‘सनातन प्रभात’ नियतकालिकांच्या वाचकांना संपर्क करायला जातात. एखाद्या वाचकाने पुन्हा बोलावले असल्यास त्या काकांना संपर्काला पाठवतात.
आ. काकू सनातनची सात्त्विक उत्पादने, ग्रंथ आणि हस्तपत्रके यांच्या वितरणाच्या सेवेत वाचकांना सहभागी करून घेतात.
४. सेवेची तळमळ
अ. काकूंची शारीरिक स्थिती नाजूक आहे, तरी त्या तळमळीने प्रसारसेवा करतात.
आ. सोलापूर येथे हिंदु राष्ट्र-जागृती सभेचा प्रसार चालू असतांना काकू घरोघरी जाऊन प्रसार करणे आणि हिंदुत्वनिष्ठांच्या बैठका घेणे, या सेवा तळमळीने करत होत्या.
इ. काकू ‘सनातन प्रभात’ नियतकालिकांच्या वाचकांचे नूतनीकरण समयमर्यादेत करतात.
५. भाव
अ. त्या आम्हाला वाचकांच्या अनुभूती सांगत असतांना त्यांची भावजागृती होते.
आ. त्यांना गुडघेदुखीचा तीव्र त्रास आहे, तरी त्या प्रसारसेवेसाठी जातात. त्या म्हणतात, ‘‘पायाचे दुखणे प्रारब्धानुसार आहे.’’ ‘गुरुसेवा केली, तर आनंद मिळेल’, असा त्यांचा भाव असतो.
इ. काकू नेहमी सांगतात, ‘‘मी पुष्कळ अल्प पडते. परात्पर गुरुदेव माझ्यासाठी किती करतात !’’
– कु. दीपाली मतकर (आध्यात्मिक पातळी ६९ टक्के), सोलापूर (२८.११.२०२०)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |